सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाबाहेर मंगळवारी मोठा गोंधळ बघायला मिळाला, मात्र आता पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार निलेश राणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरटीई प्रवेश अर्जासाठी आता 16 फेब्रुवारी पासून ऑनलाइन अर्ज
मंगळवारी जिल्हा न्यायालयाच्या बाहेर आमदार नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्यानंतर पोलिसांशी माजी खासदार निलेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली होती, निलेश राणे यांना पोलिसांशी हुज्जत आता महागात पडले आहे. ओरोस पोलिसांनी निलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे याप्रकरणात पुढे कारवाई झाल्यास राणे कुटुंबीयांना आणखी एक धक्का बसू शकतो.
ठाणे येथील बीआर हरणे आयुर्वेद महाविद्यालय मध्ये विविध पदांसाठी भरती, आजच अर्ज करा !
सध्या संतोष परब हल्लाप्रकरणात भाजप आमदार नितेश राणे जामिनासाठी न्यायालयात फेऱ्या मारत असताना पोलिसांशी हुज्जत घालणे आणि बेकायदेशीर जमाव करणं, सार्वजनिक ठिकाणी शांततेचा भंग करणे यासह अन्य कारणे दाखवत निलेश राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हे दाखल करण्याच्या प्रकीयेमुळे निलेश राणे आणि नितेश राणे दोघेही अडचणीत आले आहेत.
केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली – डॉ.अजित नवले
दरम्यान, निलेश राणे यांच्यावर पोलिसांशी हुज्जत घालणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे, या कलमांखाली गुन्हा दाखल व्हावा, यासाठी शिवसेना आमदार वैभव नाईक आग्रही होते. वैभव नाईक यांनी पोलिसांनी तसे पत्रही पाठवले होते.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा