नंदुरबार, ता ३१ : गेल्या १३ महिने किसान, शेतमजुर व कामगार हे दिल्लीच्या सिमेवर शांततेने आंदोलन करीत होते. केंद्र शासनाने किसान संयुक्त मोर्चाच्या मागण्यांबाबत १९ डिसेंबर २०२१ रोजी ०३ कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली व बाकीच्या मागण्यांबद्दल कमिटी स्थापन करुन त्यांच्याकडून मागण्या मंजुर करण्याची घोषणाही केली. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल कमिटीची स्थापना केली गेली नाही. किसान मोर्चाला खोटे आश्वासन देवून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. असे शेतकरी संघटनांनी म्हटले आहे.
त्यामुळे संयुक्त किसान मोर्च्याच्यावतीने ३१ जानेवारी २०१२ रोजी देशव्यापी आंदोलन करुन मोदी सरकारचा धिक्कार करण्यात आला. या आंदोलनाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियनमार्फत नंदुरबार जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांची निराशाच केली – डॉ.अजित नवले
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला मध्ये विविध पदांच्या ११४९ जागा! आजच अर्ज करा!
“या” मागण्या करण्यात आल्या
१) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दिडपट हमी भाव देणारा कायदा करा.
२) शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा व थकीत वीज बिलेही माफ करा.
३) २०२० चे वीज विधेयक रद्द करा.
४) कामगारांबाबत ४ श्रमसंहिता लेबरकोड रद्द करुन पूर्वीच्या कामगार हिताचे कायदे लागू करा व अंमलबजावणी करा.
५) लखमीपुर (खिरी) येथे शेतकऱ्यांच्या हत्या करण्याचा कट रचणाऱ्या गृहराज्यमंत्री श्री. अजय मिश्रा टेनी यांना मंत्री पदावरुन हटवुन त्यांच्यावर खुनाची केस दाखल करुन अटक करा.
मॉल्समध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा – जनवादी महिला संघटना आक्रमक
६) किसान आंदोलनात शहिद झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नुकसान भरपाई अदा करा व त्यांच्या नातेवाईकांना सरकारी नोकरीत समाविष्ट करा.
७) डिझेल, पेट्रोलची दरवाढ रद्द करून महागाईला आळा घाला.
८) भुमिहीन व बेघर कुटूंबांना घरकुल योजनेचा लाभ देण्याविषयी सर्व्हे करून गरजु लोकांना घरकुल अदा करा.
९) भुमिहीन शेतमजुरांना गायराण पडीत जमिनीचे वाटप करा.
१०) दादासाहेब सबलीकरण योजनेमार्फत शासकीय खरेदी करुन जमिनीचे भाव वाढ करून जमीन वाटप करा.
‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर
११) किसान आंदोलनाच्यावेळी खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत
१२) मनरेगाची कामे सुरु करा अन्यथा बेरोजगार भत्ता लागु करा
यावेळी माकप सचिव सुनील गायकवाड, उत्तम पवार, संतोष गायवाड, कासुबाई ठाकरे, सुनीता मोरे, प्रताप ठाकरे, राजाराम ठाकरे, मासूम मण्यार, रफिक शेख, हरूभाऊ सोनवणे, रवी मोरे, दत्तराज रावताळे, विश्वजीत भामरे, दिनेश गुलाले, नहीम सैय्यद, ईश्वर पाडवी यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा