Saturday, May 11, 2024
Homeआरोग्यकोरोनाकरोनाने नाही, कष्टकरी उपासमारीने मरतील ; पुन्हा ताळेबंदी नको - कामगारांची मागणी

करोनाने नाही, कष्टकरी उपासमारीने मरतील ; पुन्हा ताळेबंदी नको – कामगारांची मागणी

पिंपरी : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांवर फार मोठा परिणाम झाला असून आजवर कर्जे काढून जगत आहोत जवळची सर्व पुंजी संपली आता कसेतरी काम मिळतयं, कडक निर्बंध गरजेचे आहे मात्र पुन्हा लॉकडाऊन  झाल्यास कोरोना विषाणूने नाहीतर उपासमारीने मरु म्हणून पुन्हा लॉकडाउन नको अशी साद कष्टकरी वर्गाने राज्य व केंद्र शासनाकडे आज केली आहे.

वर्किंग पिपल चार्टर व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे  टाळेबंदीनंतरचे वर्ष याबाबत कष्टकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, उमेश ड़ोर्ले, विनोद गवई, इरफान चौधरी, माधुरी जलमुलवार, वंदना थोरात, सीमा शेख रूपाली शिंदे, राणी शारद, सपना जाधव, पललवी देवकुळे, विमल झोबाडे, जालिंदर गायकवाड, युवराज काळे, मधुकर वाघ आदी उपस्थित होते.

यावेळी नखाते म्हणाले, श्रमिक वर्गातील ८०% कामगारांचा टाळेबंदीतून रोजगार हिरावला गेला आहे, त्यामध्ये मजूर, श्रमिक, फेरीवाले, बांधकाम कामगार, घरकाम महिला, कंत्राटी कामगार, रिक्षाचालक यांचा समावेश आहे. २४ मार्च २०२० रोजी टाळेबंदी जाहीर करण्यात आली यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले. काही कालावधीनंतर पुन्हा काही व्यवहार सुरू झाले मात्र पुढे ५०% कामगारांची उपस्थितीची अट घालण्यात आल्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. लॉकडाउनच्या पूर्वी देशभरातील निर्मिती क्षेत्रातील बेरोजगारांचे प्रमाण २.२२ % वरुन ९२.६६ वर पोहिचले, बांधकाम क्षेत्रातील ४.५५ वरुन ८७. ७६ पर्यंत पोहोचले. ते आता ८३.८५ वर आलेली आहे. पुरेशी व्यवस्था व योग्य नियोजन न करताच लॉकडाऊन केल्यामुळे अनेक कामगारांवरती फार मोठे परिणाम झाले असून त्यांना योग्य वेळी आवश्यक राशन सुद्धा मिळाले नसून या कालावधीमध्ये वेतन न देताच कंत्राटदार पळून गेले आहे. आधीच उत्पन्न कमी आणि बचत नसल्यामुळे देशभरातील 58% मजुराने कर्ज काढून या कालावधीमध्ये पोट भरले अशी स्थिती निर्माण झालेली आहे हा वर्ग एक प्रकारच्या कर्जाच्या गुलामीत लोटला गेला आहे, या वर्गाकडे कागदपत्रं नसल्यामुळे बँका कर्ज देत नाहीत इतर फायनान्स कंपन्या किंवा सावकाराकडून कर्ज काढल्यामुळे ते फेडता फेडताच मोठ्या संकटात ओढले जातात.  असे असताना पाच महानगरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे असे झाले तर फार मोठा परिणाम या क्षेत्रावर ती होऊ शकतो असे नखाते म्हणाले.

त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन अशी नको अशी मागणी या वर्गाने केली आहे. संसर्ग टाळण्यासाठी अत्यावश्यक असणारे प्रतिबंधात्मक नियम करणे व त्याचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे, आवश्यकता वाटल्यास आठवड्यातून दोन दिवस टाळेबंदी झाली तर हरकत नाही मात्र पूर्णतः जर लॉकडाऊन केले तर  सामान्यपासून ते कष्टकऱ्यांपर्यंत सर्वच जेरीस येतील. पुन्हा लॉकडाऊन केले तर कोरोना संसर्गाने नाही तर उपासमारीने मरतील अशी स्थिती आहे त्यामुळे प्रशासनाने याबाबत कडक निर्णय घ्यावे मात्र पुन्हा लॉकडाऊन नको अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय