Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडतीर्थक्षेत्र आळंदीत एकादशी दिनी कुर्बानी नाही - मुस्लिम समाजाचा निर्णय

तीर्थक्षेत्र आळंदीत एकादशी दिनी कुर्बानी नाही – मुस्लिम समाजाचा निर्णय

निर्णयाचे परिसरात स्वागत ; शांतता कमेटीत निर्णय जाहीर

आळंदी / अर्जुन मेदनकर
: राज्यात आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याने आळंदीत तसेच परिसरात आळंदी मुस्लिम समाजच्या वतीने बकरी ईद ची कुर्बानी न देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे परिसरातून स्वागत करण्यात आले. मात्र ईदची नमाज होणार आहे. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. सुनील गोडसे सर, चाकण विभागाचे आयुक्त मा श्री राजेंद्रसिंग गौर साहेब तसेच आळंदी गावातील दक्षता समिती सदस्य मा श्री डी. डी. भोसले पाटील तसेच प्रकाश कुऱ्हाडे पाटील, संजय घुंडरे पाटील, उत्तम गोगावले, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, आळंदी मुस्लिम समाज बांधवां मध्ये हमीद शेख, सुलतान शेख, आरिफ शेख, निसार सय्यद, महमद हकीम, इम्रान हकीम, रइस तांबोळी, आय्याज इनामदार, कमेटी सदस्य हमीद शेख ,मोहसिन शेख ,अरबाज शेख, इरफान शेख, दक्षता समिती सदस्य उपस्थित होते. या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी ॲड नाजीम शेख, ॲड सोहेल शेख यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांचे वतीने सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गौर यांचा आभार व्यक्त करत सत्कार करण्यात आला.



आळंदी पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्र सिंह गौर यांच्या अध्यक्षते खाली झाले. यावेळी आळंदी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, शांतता कमिटीचे सदस्य डी डी भोसले पाटील, प्रकाश कुऱ्हाडे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


गुरुवारी ( दि. २९ ) आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही धार्मिक सण एकाच दिवशी आल्याने एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करण्यासाठी आळंदी शहरातील मज्जिदचे जिम्मेदार व मुस्लिम बांधवांकडून ईदची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या दिवशी धार्मिक कार्यक्रम आणि ईदची नमाज होणार होणार आहे. यावेळी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे कायदा, शांतता, सुव्यवस्था आणि धार्मिक सद्भावना कायम राहावी. यासाठी आळंदी पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटी, स्थानिक नागरिक, पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मुस्लिम समाज बांधव यांची संयुक्त बैठक आळंदी पोलीस स्टेशन येथे पार पडली. या बैठकीत आळंदी व परिसरात कुर्बानी देण्यात येणार नाही. परिसरातील विविध गावातील समाज बांधवांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.


पिंपरी चिंचवड आयुक्तालय अंतर्गत आळंदी पोलिस स्टेशन अंतर्गत गावात देखील मुस्लिम बांधवानी ईदची कुर्बानी आषाढी एकादशी असल्याने न देण्याचा निर्णय घेतला आहे. बकरी ईद निमित्त आळंदी पोलीस स्टेशन अंतर्गत शांतता कमिटी व मुस्लिम समाज बांधव यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहा.पोलिस आयुक्त चाकण विभाग राजेंद्रसिंह गौर यांचे प्रमुख उपस्थितीत झालेल्या निर्णयाचे परिसरातून स्वागत करण्यात आले. ईद दिनी कुर्बानी दिली जाणार नाही. असा निर्णय या बैठकीत मुस्लिम समाज बांधव ,पदाधिकारी यांनी जाहीर केला. यावेळी आषाढी एकादशी निमित्त हिंदू बांधवांना मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा दिल्या. तसेच ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शांतता कमिटीच्या बैठकीत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी मुस्लिम बांधवांनी ईदच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. मुस्लिम समाज बांधव, शांतता कमेटी सदस्य, आळंदीपोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त चाकण विभाग राजेंद्रसिंह गौर यांनी या बैठकीत मार्गदर्शन करीत सुसंवाद साधला.

‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ !

ज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन


संबंधित लेख

लोकप्रिय