Thursday, May 2, 2024
Homeजिल्हाAhilyadevinagar : निलेश लंके आणि रोहित पवार यांची उद्यापासून कर्जत-जामखेडमध्ये स्वाभिमान जनसंवाद...

Ahilyadevinagar : निलेश लंके आणि रोहित पवार यांची उद्यापासून कर्जत-जामखेडमध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा

कर्जत जामखेड (ता.८) : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे (जि. अहिल्यादेवीनगर) ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाचे अधिकृत उमेदवार निलेश ज्ञानदेव लंके यांची ‘स्वाभिमान जनसंवाद यात्रा’ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात येत आहे. यानिमित्त आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि निलेश लंके (Nilesh Lanke) यांची ही जनसंवाद यात्रा सलग तीन दिवस कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावांना भेटी देणार आहे. (Ahilyadevinagar)

स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची सुरुवात ९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता खर्डा येथून होणार असून नंतर सकाळी ११ वाजता नायगाव, दुपारी १२ वाजता राजुरी, दुपारी ३ वाजता नात्रज, सांयकाळी ४ वाजता चौंडी, सांयकाळी ७ वाजता जामखेड शहरातील नागरिकांशी निलेश लंके आणि आमदार रोहित पवार संवाद साधणार आहेत. (Ahilyadevinagar)

दुसऱ्या दिवशी १० एप्रिलला सकाळी ८ वाजता चापडगाव येथून यात्रेची सुरूवात होणार असून सकाळी १० वाजता माही जळगाव, दुपारी २ वाजता कोंभळी, दुपारी ३ वाजता निमगाव गांगर्डा, सांयकाळी ६ वाजता मिरजगाव आणि रात्री ८ वाजता कोरेगाव येथे निलेश लंके आणि आमदार रोहित पवार नागरिकांशी चर्चा करणार आहेत.

तसेच ११ एप्रिल ला सकाळी ८ वाजता अंबी जळगाव, १० वाजता कर्जत शहर, दुपारी १ वाजता शिंदे गाव, दुपारी २ वाजता कुळधरण, सांयकाळी ५ वाजता भांबोरा, सांयकाळी ६ वाजता बारडगाव सू., आणि सांयकाळी ७ वाजता राशीन येथे निलेश लंके आणि आमदार रोहित पवार नागरिकांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आलीय.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

मोठी बातमी : शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

मोठी बातमी : एकनाथ खडसे यांची लवकरच भाजपमध्ये घर वापसी होणार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय