Friday, December 6, 2024
Homeराज्यमोठी बातमी : ११ एप्रिलला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची परीक्षा...

मोठी बातमी : ११ एप्रिलला होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची परीक्षा ढकलली पुढे

मुंबई : कोरोना रुग्‍णांची संख्या चिंताजनकरित्‍या वाढत चालली आहे. अशा परीस्‍थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणे योग्‍य ठरणार नाही. परीक्षा झाल्‍यास या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होण्याची भिती उमेदवारांकडून व्‍यक्‍त केली जात होती. या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. त्यामुळे राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती.

संबंधित लेख

लोकप्रिय