Saturday, May 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयविशेष लेख : नवे जागतिक बदलते चित्र, युद्धाकडून आर्थिक विकासाकडे - डॉ....

विशेष लेख : नवे जागतिक बदलते चित्र, युद्धाकडून आर्थिक विकासाकडे – डॉ. सुभाष देसाई

तालिबान आता पूर्वीसारखा राहिलेला नाही डिसेंबर 1999 मध्ये हे भारताचे विमान हायजॅक केलेले होते तेव्हा मोहम्मद उमर यांनी कंदहार मध्ये दहा दिवस तालिबानची वाटाघाटी करताना भारताला मदत केलेली होती त्यावेळी अमेरिका-पाकिस्तान नात्यात तणाव होता. आता अमेरिका आपले सैन्य अफगाणिस्तानातून मागे घेत आहे त्यामुळे भारत पाकिस्तानला नवी चिंता सतावत आहे. काबूलमध्ये तालिबानची पकड वाढली तर ती दोहोनाही काळजी आहे .

वस्तुस्थिती अशी आहे की पूर्वी प्रमाणे तालिबान पाकिस्तानशी प्रामाणिक राहिलेला नाही. त्याने आपले संबंध रशिया, चीन, इराण आणि अरब राष्ट्राशी जोडलेले आहेत. त्यामुळे पाकचे तालिबान वर नियंत्रण नाही.

तालिबानला आता हवीये ती शस्त्रे आणि पैसा. खुद्द अफगाणिस्थानमध्ये पठाणानी शस्त्रसाठा भरपूर केलेला आहे त्यामुळे आता त्यांना जर गरज असेल तर ती तालिबान ना राजकीय मान्यतेची गरज आहे.२० वर्षापूर्वी तो अतिरेकी गट होता त्याच्याशी कोणालाही संबंध ठेवावेसे वाटत नव्हते पण आता तालिबानशी संबंध ठेवणे, त्यांना निमंत्रण देणे याबाबत स्पर्धा सुरू आहे म्हणून पाकला ते किंमत देत नाहीत तर त्यांना आता  इराण शास्त्रे पुरवू लागला आहे. 

आता पाकची हि भूमिका बदललेली आहे. लष्करप्रमुख जनरल वाजवानी चांगली भूमिका घेतली पण त्यांच्या नंतर येणारा जनरल तशीच भूमिका घेईल की नाही हे सांगता येत नाही. अमेरिकेत काय झाले बघा.          

ट्रंपच्याबरोबर उलटी दिशा बायडनने घेतली त्यामुळे पाच लष्करप्रमुख आता Geo economic interest भौगोलिक आर्थिक हिताची भाषा बोलू लागला आहे यापूर्वी Geopolitical, Geosecurity भौगोलिक राजकीय, भौगोलिक सुरक्षा ही भाषा वापरत होता त्यामुळे भारत हा त्याला पूर्वीप्रमाणे  कट्टर शत्रू वाटत नाही.

तालिबानचा संस्थापक-सदस्य मुल्ला अब्दुल सलाम यांनी स्पष्ट केले आहे की अफगाणिस्तानच्या अनेक क्षेत्रात भारताची भरघोस मदत झाली आहे. तालिबान अफगाणिस्तान चा वापर भारताविरुद्ध करू देणार नाही, असे त्याने आश्वासने दिली आहे. गेली दोन दशके अफगाणिस्तानच्या बाबतीत विकास पार्टनर भारत बनला आहे. ३ बिलियन अमेरिकन डॉलर्स भारताने गुंतवणूक केली आहे, ही काही फार मोठी रक्कम आहे असे नाही. पण तेथे त्यांचे संसद भवन, सलमा धरण, आलाराम हायवे प्रोजेक्ट असे छोटे-मोठे प्रोजेक्ट 34 प्रांतात भारताने उभा केले. 2018 पासून भारत अफगान हवाई वाहतूक सुरू झाली, त्यामुळे दोन्ही देशात आयात निर्यात वाढली. 500 मालवाहतूक फेर्‍या झाल्या त्यातून अफगाणिस्तानातील ५००० मेट्रिक टन माल भारतात आला.

भारताने या विदीर्ण झालेल्या देशात अनेक चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन दिले. क्रिकेटर रशीद खान हा अफगाणिस्तानातील तरुणांचा लाडका खेळाडू इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळल्याने त्याला आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. 16000 अफगान तरुण भारतात सध्या उच्च शिक्षण घेतात तर गेल्या दोन दशकात 60 हजारांवर विद्यार्थी भारतात शिकून मायदेशी परतले. या सर्व गोष्टींचा आढावा घेतला तर अफगाणिस्थान म्हणजे अलक्वेदा नाही तालिबानही नव्हे. भारत आणि अफगाणिस्तान यांचे सध्या संबंध चांगलेच आहेत, यात शंका नाही. त्यामुळे अतिरेकी पठाणांचा भारताला फार त्रास होईल, अशी शक्यता कमी आहे. 

– डॉ. सुभाष देसाई, ज्येष्ठ विचारवंत

कोल्हापूर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय