मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवी राजकीय समीकरण जुळून आलं आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येणार अशी मोठी घोषणा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची घोषणा करण्यात आली. लोकशाही टिकवण्यासाठी संभाजी बिग्रेड आणि शिवसेना एकत्र येण गरजेच असल्याचे संभाजी बिग्रेडच्या प्रमुख प्रवक्त्याने म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती तसेच, संविधान टिकवण्यासाठी युती केली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आमच्याकडे काही नसता सोबत आलात त्यामुळे संभाजी ब्रिगेडचे कौतुक वाटतं असल्याचे ठाकरेंनी म्हटले. तसेच, आमचं हिंदुत्व पटल्याने आम्ही एकत्र येत आहोत. लवकरच महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घेणार आहे. ही वैचारीक युती आहे. जे बिघडलंय ती शिवरायांचा महाराष्ट्राचा नाही. विचार मजबूत करायचा असेल तर एकत्रही लढू. असा इशाराही ठाकरेंनी यावेळी दिला.
शिंदेच्या बंडाने शिवसेनेला मोठं खिंडार पडले. शिंदे गटाच्या या बंडानंतर शिवसेनेने हा मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या या निर्णयाचा कुणाला किती फायदा होणार हे बघावे लागणार आहे.
दरम्यान, विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक निवडणुकांसाठी एकत्र लढण्याची तयारी केली जाणार आहे, असे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.