मुंबई : उच्च जातीय शिक्षकाच्या मडक्यातील पाणी प्यायल्याने राजस्थानातील दलित शाळकरी विद्यार्थ्यांच्या हत्येच्या निषेधात मुंबई विद्यापीठात आज झाली निषेध सभा आणि तीव्र निदर्शने आयोजित करण्यात आली होती.
मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येऊन ‘संयुक्त विद्यार्थी आघाडी’ गठीत केली .अन्यायाविरुद्ध बोलणे ही विद्यार्थ्यांची नैतिक जबाबदारी आहे .ह्या भावनेतून सर्व सुधारणावादी ,आंबेडकरी ,डाव्या आणि इतर समविचारी युवा संघटना नि मिळून मुंबई विद्यापीठाच्या मुख्य द्वारावर आज निषेध सभा आणि निदर्शने केली.
निषेधाच्या सभेत विविध शाहिरांनी आपली जनवादी शाहिरी प्रस्तुत केली तसेच ,डाव्या ,आंबेडकरवादी , पुरोगामी संघटनांनी आपल्या प्रतिनिधी द्वारे देशातील जातीवादाच्या जाहीर निषेध व्यक्त केला गेला .शेवटी संविधानाची प्रस्थावना वाचून नंतर जातीव्यवस्थे च्या चातुर्वर्ण्य उतरंडीचे प्रातिनिधीक मडके मुलींनी आपल्या पायांनी फोडून ब्राम्हण क्षत्रिय वैश्य शूद्र ,ह्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा विरोध केला आहे.
या निषेध आंदोलनात सर्व पुरोगामी,समतावादी,आंबेडकरवादी ,डाव्या विद्यार्थी व युवक संघटना सहभागी झाल्या होत्या. स्टुडन्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रवीण मांजलकर, जनवादी महिला संघटना सुगंधी फ्रान्सिस, सत्यशोधक विद्यार्थी विवेक मोरे, ऑल इंडिया स्टुडन्ट फेडरेशन अमीर काझी, ऑल इंडिया युथ फेडरेशन शिवाजी बडेकर, मजीद शेख, दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समितीचे शाहीर शशांक कांबळे, अश्विन कांबळे, डेमोक्रेटिक फेडरेशन ऑफ इंडिया चे तब्रेज, गौतम यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. विद्यार्थी युवक महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
---Advertisement---
---Advertisement---
मुंबई विद्यापीठाच्या ‘संयुक्त विद्यार्थी आघाडी’ तर्फे इंद्र मेघवाल ला न्याय देण्यासाठी तीव्र निषेध सभा !
---Advertisement---
- Advertisement -