Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : टेक ऑफ करताना विमान कोसळलं, १५ जणांचा मृत्यु

मोठी बातमी : टेक ऑफ करताना विमान कोसळलं, १५ जणांचा मृत्यु

Nepal Plane Crash : नेपाळची राजधानी काठमांडू येथून पोखराला जाणारे सौर्य एअरलाइन्सचे विमान बुधवारी सकाळी उड्डाण घेत असताना त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात फ्लाइट क्रूसह १९ लोक होते.

वृत्त संस्था ANI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. विमानाचा कॅप्टन मनीष शाक्य यांच्यासह दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. अपघातानंतर विमानाला लागलेल्या आगीमुळे विमानतळावर धुराचे प्रचंड लोट पसरले. (Nepal Plane Crash)

वरिष्ठ पोलीस अधीक्षक डंबर बीके यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व १९ जण सौर्य एअरलाइन्सचे कर्मचारी होते. काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, टेकऑफच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरले आणि परिणामी ही दुःखद घटना घडली. विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे.

Nepal Plane Crash

दरम्यान, टेकऑफच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरले, परिणामी हा अपघात झाला. या अपघातामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

संबंधित लेख

लोकप्रिय