Friday, May 3, 2024
Homeताज्या बातम्याNCP × Shivsena : '..तर राष्ट्रवादीही महायुतीचा धर्म तोडू शकते'; अजित पवार...

NCP × Shivsena : ‘..तर राष्ट्रवादीही महायुतीचा धर्म तोडू शकते’; अजित पवार गटाचा शिवसेनेला इशारा

NCP × Shivsena : लोकसभा मतदार संघात जर महायुतीचा धर्म तोडत राहिले तर शिवसेना ज्या मतदार संघात लढणार आहे, तिथे राष्ट्रवादी महायुतीचा धर्म तोडू शकते’, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी शिवसेना शिंदे गटाला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारामती लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात टीका सुरू केल्या आहेत. मतदार संघात लोकसभा लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विजय शिवतारे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक होऊनही शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी निवडणूक लढणार असंच जाहीर केले आहे. (NCP × Shivsena)

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला इशारा दिला. आनंद परांजपे म्हणाले, आम्हाला महायुतीचे वातावरण बिघडवायचे नाही. परंतु विजय शिवतारे सातत्याने विरोधात वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे त्यांचेच नेते ऐकत नाहीत असा मेसेज जात आहे. शिवसेनेच्या विजय शिवतारे यांच्याकडून सातत्याने बारामती लोकसभा मतदार संघाचे वातावरण खराब करण्याचं काम सुरू आहे.

त्यामुळे, जर शिवसेना ही लोकसभा मतदार संघात जर महायुतीचा धर्म तोडत राहिली तर शिवसेना ज्या मतदार संघात लढणार आहे, तिथे राष्ट्रवादी महायुतीचा धर्म तोडू शकते’, असा इशारा आनंद परांजपे यांनी दिला आहे.

whatsapp link

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय