Friday, November 22, 2024
Homeराजकारणमोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी "या" दोन नेत्यांची वर्णी, शरद...

मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी “या” दोन नेत्यांची वर्णी, शरद पवार यांची घोषणा

नवी दिल्ली : खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या नवे कार्यकारी अध्यक्ष पदी निवड झाल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. आज राष्ट्रवादीचा २५ वा वर्धापनदिन आहे. दिल्ली येथील कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा केली आहे.

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, झारखंड या राज्यांची जबाबबदारी प्रफुल्ल पटेल यांच्यावर देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र, हरियाणा, महिला, युवक- युवती, आणि लोकसभेची जबाबदारी सप्रिया सुळे यांच्यावर देण्यात आली आहे.

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी २५ वर्षांच्या सहकार्यासाठी सर्वांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी, कष्टकरी यांच्यासाठी राष्ट्रवादीचा जन्म झाला. या २४ वर्षात पक्षाला अनेक परिस्थितीचा सामना करावा लागला. २४ वर्ष जनतेची सेवा करण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली.

यावेळी भाजपावर निशाणा साधला शरद पवार म्हणाले, “या सरकारच्या काळात सध्या एक दिवसही असा जात नाही की, देशात कुठे ना कुठे अत्याचार होत आहे. अल्पसंख्यांक, महिलांवर अत्याचार होत आहेत. भाजप अधिकारांचा गैरवापर करत आहे.

तर देशात आज शेतकऱ्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळत नाही. देशातील तरूणांच्यापुढे सर्वात मोठी समस्या बेरोजगारीची आहे. तरूणांना रोजगाराची संधी मिळत नाही. देशात ९ वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली पण जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत भाजपचा पराभव होत आहे, असेही शरद पवार म्हणाले.

देशात परिवर्तन करायच असेल तर संघटन मजबूत करायला पाहिजे. २३ जून रोजी सर्व विरोधक बिहारमध्ये एकत्र येत आहेत. सर्वांनी मिळून काम करूया आणि देशात परिवर्तन घडवूया, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

हे ही वाचा :

‘सौरभ पिंपळकर हा भाजपाचाच कार्यकर्ता’, चंद्रशेखर बावनकुळे यांची कबुली; पण ती धमकी नाही…

‘मुख्य सल्लागार’ म्हणूनची आमची नावे काढा; सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांचे NCERT ला पत्र ? वाचा सविस्तर!

‘ह्याच्यावर संस्कार झाले आहेत… फक्त नथूरामाचे’, जितेंद्र आव्हाडांचा फोटो शेअर करत भाजपावर निशाणा

‘गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना’ आहे तरी काय ? वाचा !

खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ – केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

शरद पवार यांना धमकी देणाऱ्याचे या राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल, धमकी देणारा कोणत्या पक्षाचा ?

संबंधित लेख

लोकप्रिय