Karnataka Assembly Election Result 2023 : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेच्या मतमोजणीला सुरूवात आहे. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीच्या कलानुसार कॉंग्रेस आघाडीवर असून भाजप पिछाडीवर पडले आहे. तर जेडीएस अजूनही किंगमेकर च्या भूमिकेत आहेत.
तर बेळगावात सुध्दा भाजप पिछाडीवर असून कॉंग्रेस आघाडीवर आहे. तर बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली आहे.
राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी आघाडी घेतली असून भाजपच्या शशिकला जोल्ले, कॉंग्रेसचे काकासाहेब पाटील पिछाडीवर आहेत. काँग्रेस-भाजपमध्ये काँटे की टक्कर असताना प्रमुख नेते पिछाडीवर त्यामुळं राष्ट्रवादी कर्नाटकात खातं उघडणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
कर्नाटकातील 224 जागांसाठी 10 मे रोजी निवडणूक झाली. कर्नाटकातील निवडणुकीसाठी 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
हे ही वाचा :
कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार
कर्नाटक निवडणूक निकाल : काँग्रेस आघाडीवर तर भाजप पिछाडीवर; तर बेळगावात…
जयंत पाटील यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा निषेध करत माकप कडून कडवी टिका
बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करा – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
हिमोफीलिया सोसायटी ऑफ पुणे कडून जागतिक परिचारिका दिन साजरा
कर्नाटकात भाजप की काँग्रेस ? ‘जेडीए’ किंगमेकर ठरणार