Thursday, May 2, 2024
Homeराजकारणब्रेकिंग : विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” नेत्याची निवड

ब्रेकिंग : विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या “या” नेत्याची निवड

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात भाजप-शिंदे गटाचे सरकार स्थापन झालं. यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. रविवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुक पार पडली. तर आज सोमवारी शिंदे फडणवीस सरकारने आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध केले. राज्यातील या सत्तांतरानंतर माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड करण्यात आली.

शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदी कोणत्या नेत्यांची वर्णी लागेल याबाबत चर्चा सुरू होती. या चर्चांना आता पुर्ण विराम मिळाला आहे. विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र देण्यात आले होते.  विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्या नावाची घोषणा केली.

दरम्यान, विरोधी पक्ष नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांच्या नावाची चर्चा होती. अखेर पक्षाने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय