Friday, April 19, 2024
Homeहवामानराज्यात पावसाचा जोर वाढणार, “या” जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढणार, “या” जिल्ह्यांना यलो अलर्ट

मुंबई : भारतात आता मान्सूनचं आगमन झालेलं आहे. हवामान विभागाने गुजरात, कोकण, गोवा, कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग, तेलंगण, तमिळनाडू, पाँडिचेरी, केरळ या भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर ४ ते ७ जुलै या काळात मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 4 ते 7 जुलैदरम्यान कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीला तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, कोल्हापूर, ठाणे, पालघर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम या जिल्ह्यांना (4 ते 7 जुलै) दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी (4 ते 7 जुलै), गडचिरोली (5 ते 7 जुलै), अकोला (5 जुलै), चंद्रपूर (6 जुलै) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, विजांच्या कडकडाटासह राज्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. यात प्रामुख्याने संपूर्ण कोकणासह मुंबई, ठाणे व मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, तसेच विदर्भालादेखील सावधानेचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय