प्रतिनिधी : कोळसा खाण कामगारांचा आज पासून केंद्राच्या खाजगीकरण आणि कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात ३ दिवसांचा संप पुकारला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने देशातील कोळसा खाणी सह सर्व खाणी, रेल्वे, डिफेन्स संरक्षण कारखाने, एलआयसी व अन्य सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरणाचे विक्रीचे धोरण अवलंबले आहे. देश कोरोना व लॉक डाऊन मुळे त्रस्त असताना जनतेच्या अडीअडचणी कडे व समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी पंतप्रधान मोदींनी कोळसा खाण्याची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.त्याविरुद्ध कोळसा खाण कामगारांनी देशव्यापी संप आज पासून सुरू केला आहे.
आतापर्यंत आलेल्या रिपोर्टनुसार १०० टक्के कामगारांनी या संपात सहभाग केल्याचे दिसून येते. अत्यावश्यक सेवा, सुरक्षा कर्मचारीही संपात सहभागी आहेत. खाजगी कोळसा खाणी बंद आहेत. त्याचबरोबर ठेकेदारी कामे सुद्धा बंद आहेत. कामगारांच्या संपाला सिटूसह सर्व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याचे सेंटर ऑफ ट्रेंड युनियन (सिटू) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी.एल.कराड यांनी सांगितले.
कोळसा खाण कामगारांचा संप ३ दिवस चालणार आहे. केंद्र सरकारला देशाची संपत्ती विकण्याचे धोरण मागे घ्यावे यासाठी हा संप चालू आहे.