Tuesday, May 7, 2024
Homeजिल्हाNashik : इपीस ९५ पेंशनर्स भाजप विरोधात प्रचार करणार; तसेच उमेदवार देणार

Nashik : इपीस ९५ पेंशनर्स भाजप विरोधात प्रचार करणार; तसेच उमेदवार देणार

नाशिक : इपीस ९५ पेंशनर्स लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात प्रचार करणार असून वेळ पडल्यास उमेदवार देण्याचा निर्णय नाशिक जिल्हा पेंशनर्स फेडरेशन च्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी नाशिक (Nashik) जिल्हा पेंशनर्स फेडरेशन संस्थापक अध्यक्ष, आयटक नेते कॉ. राजू देसले होते.

देसले म्हणाले, भारतीय जनता पक्ष ने २०१३ मध्ये तत्कालीन भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी भाजप सरकार आल्यावर तसेच तत्कालीन भाजपाचे राज्यसभेचे खासदार भगतसिंग कोशियारी यांनी इपीएस ९५ पेंशनर्स ना ३ हजार रूपये महागाई भत्तासह लागू करू व मोफत आरोग्य सुविधा देऊ अशी शिफारस केली होती.

सातत्याने दिल्लीत व देशभर आंदोलन १० वर्ष सूरू आहेत. कोरोना काळात पैश्या अभावी पेंशनर्स नी जीव गमावला आहे. म्हणून जगण्यासाठी ९ हजार रूपये महागाई भत्ता सह लागू करा. व मोफत आरोग्य सुविधा दया. यासाठी आंदोलन सूरू आहे. २०२४च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजप चा पराभव करण्याचा ठराव करण्यात आला. वेळ पडल्यास पेंशनर्स, कामगार, शेतकरी प्रश्नी काम करणारा उमेदवार सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष चेतन पणेर यांनी केले. शिवाजी ढोबळे, नामदेव बोराडे, सुभाष शेळके, रमेश खापरे, शिवराम रसाळ, लक्ष्मण अत्रे, दत्ता साठे, उत्तम आढाव, मधुकर सूर्यवंशी, शेख नईम, विठोबा खुले, रामचंद्र टिळे, कृष्णा शिरसाठ, अशोक जाधव, आदि नी मनोगत व्यक्त केले. सेवानिवृत्त एस.टी., एचएल, आद्योगिक कामगार, साखर कामगार, विडी, वीज कर्मचारी आदी १६२ आस्थपनातील कर्मचारी ७० लाख पेन्शनर आहेत. नाशिक (Nashik) विभागात दीड लाख पेन्शनर आहेत.

whatsapp link

हे ही वाचा :

Mirzapur 3 : मिर्झापूरच्या तिसऱ्या सिझनच्या रिलीज संदर्भात महत्वाची माहिती समोर

ब्रेकिंग : प्रकाश आंबेडकर यांचा लेटर बाँब, महाविकास आघाडी नव्हे तर ‘या’ पक्षाकडे युतीचा प्रस्ताव

ब्रेकिंग : राज ठाकरे आणि अमित शहांची भेट, राज ठाकरें लवकरच मोठा निर्णय घेणार

ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड

बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस

Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय