Wednesday, July 3, 2024
Homeजिल्हाNashik : प्रिपेड मीटर संदर्भात जिल्हाभरात आंदोलन; भाकपच्या जिल्हा कौन्सिल बैठकीत निर्णय

Nashik : प्रिपेड मीटर संदर्भात जिल्हाभरात आंदोलन; भाकपच्या जिल्हा कौन्सिल बैठकीत निर्णय

नाशिक : दिनांक २९ जून रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्हा कौन्सिलची बैठक सीबीएस येथील पक्ष कार्यालयात पार पडली. भाकपचे राज्य कॉ.राजू देसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व कॉ. भास्करराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पक्षाच्या वतीने प्रीपेड वीज मीटर संदर्भात जिल्हाभरात आंदोलन उभा करण्याचा ठराव पारित करण्यात आला. CPI Nashik

जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करून पुढच्या कामाचे नियोजन करण्याकरिता भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिक जिल्हा कौन्सिलची नियमित बैठक आज दिनांक २९ जून रोजी मेघदूत शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे स्थित पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली. नुक्त्याच पार पडलेली लोकसभा निवडणूक तसेच येणाऱ्या विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व जिल्ह्यातील कामगार कष्टकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. (Nashik)

बैठकीच्या सुरुवातीला लोकसभा निवडणुकीचा तथा पक्षाने लढलेल्या जागांच्या निकाला संदर्भात तसेच ९ जून रोजी मुंबई येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत झालेल्या निर्णयांबद्दल राज्य सहसचिव कॉ राजू देसले यांनी माहिती दिली. संपूर्ण राज्यासमोर विशेषतः शेतकरी व सामान्य वीज उपभोक्तांसमोर असलेला प्रश्न म्हणजेच प्रीपेड स्मार्ट वीज मीटर बसवण्याबद्दल गांभीर्याने चर्चा करण्यात आली. Nashik

महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे. या प्रश्नावर जिल्ह्यातील सर्व शाखांनी याबद्दल लोकांमध्ये जाऊन जनजागृती करणे व त्यातून जनआंदोलन उभा करण्याचा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला. यासोबतच येत्या विधानसभा निवडणुकीत नाशिक (पूर्व) विधानसभा मदारसंघातून पक्षाने उमेदवारी करण्याचा प्रस्ताव राज्य कौन्सिलकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

या व्यतिरिक्त नाशिक मध्ये नियोजित पक्ष कार्यकर्त्यांचा राज्य शिबीर, राज्य कौन्सिल व सचिव मंडळ बैठक, सभासद नोंदणी, जनसंघटनांचा आढावा सहित इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

या बैठकीचा समारोप करताना बैठकीचे अध्यक्ष भाकपचे ज्येष्ठ नेते व राज्य कौन्सिल सदस्य कॉ भास्करराव शिंदे यांनी सर्व कौन्सिल सदस्यांना त्यांच्या तालुक्यात बैठका घेऊन निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आव्हान केले.

यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. महादेव खुडे, ज्येष्ठ नेते राजू नाईक, जिल्हा सहसचिव कॉ. दत्तु तुपे, सुखदेव केदारे, शेतकरी नेते नामदेव बोराडे, रंगनाथ जिरे, मक्सुद अन्सारी, अण्णा आबाजी जिरे, बारकु पवार, रामचंद्र टिळे, मनोहर पगारे, रामदास भोंग, भीमा पाटील, वी.डी.धनवटे, प्राजक्ता कापडणे, तल्हा शेख सहित जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

धक्कादायक : लिफ्टमध्ये कुत्र्याला वॉकरने मारहाण; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद

धक्कादायक ! 19 वर्षीय तरुणाचा झोपेत चालताना सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

मोठी बातमी : आजपासून नवे फौजदारी कायदे लागू, वाचा काय होणार बदल !

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

ब्रेकिंग : जुलैच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात

नवीन फौजदारी कायद्यांमुळे न्यायव्यवस्थेतील अनुशेष कमी होण्यास मदत होईल – राज्यपाल रमेश बैस

मोठी बातमी : भुशी धरणात एकाच कुटुंबातील ५ जणांचा बुडून मृत्यू, धक्कादायक Video व्हायरल

मोठी बातमी : राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, वाचा कोण आहेत सुजाता सौनिक ?

‘माझी लाडकी बहीण योजना’ महिलांना मिळणार महिना 1500 रूपये; ‘अशी’ आहे अर्ज प्रक्रिया!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय