Narendra Modi : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांत महाराष्ट्रातील नऊ ठिकाणी प्रचारसभा घेणार आहेत. आजपासून सुरुवात होत असून मोदींची पहिली सभा धुळ्यात दुपारी 12 वाजता होणार आहे. नंतर नाशिकमध्ये दुपारी दोन वाजता जनतेला संबोधित करतील.
महायुतीच्या उमेदवारांसाठी विविध ठिकाणी सभा घेत नरेंद्र मोदी निवडणुकीसाठी प्रचार मोहिमेचा जोर वाढवत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाह देखील विविध सभांमध्ये सहभागी होतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह महायुतीतील अनेक नेते मोदींच्या सभांमध्ये सहभागी राहतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण वेळापत्रक :
पहिली सभा – आज, दुपारी 12 वाजता – धुळे
दुसरी सभा – आज, दुपारी 2 वाजता – नाशिक
तिसरी सभा – शनिवारी, 9 नोव्हेंबर – अकोला
चौथी सभा – शनिवारी, 9 नोव्हेंबर – नांदेड
पाचवी सभा – मंगळवार, 12 नोव्हेंबर – पुणे
सहावी सभा- चिमूर आणि सोलापूर
सातवी सभा – गुरुवार, 14 नोव्हेंबर – संभाजीनगर
आठवी सभा – रायगड
नववी सभा – मुंबई
या दौऱ्यात मोदी एक रोड शो देखील आयोजित करणार आहेत, जो त्यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग असेल. राज्यभरातील सभा आणि कार्यक्रमांद्वारे महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा मिळवण्यासाठी पंतप्रधान मोदी पूर्ण ताकदीने मैदानात उतरत आहेत.
Narendra Modi
हेही वाचा :
मुंडे बहीण-भावावर प्रवीण महाजन यांच्या पत्नीचे गंभीर आरोप
महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर
तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला
राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार
मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा
उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने
रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश
लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर