Wednesday, May 8, 2024
Homeजिल्हानांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा अभ्यास शिबिरास सुरूवात

नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा अभ्यास शिबिरास सुरूवात

नांदेड : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नांदेड जिल्हा अभ्यास शिबीर (Study Camp) दि.१२ मे रोजी दुपारी १२.०० वाजता संविधान अकॅडमीच्या अशोका बँकव्हेट हॉलमध्ये शहीद स्मारकास अभिवादन करून सुरू झाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (Communist party Of India) राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ.विजय गाभणे यांनी शिबिराचे उदघाटन केले तर माकप राज्य सचिव प्रा.डॉ.कॉ.उदय नारकर यांनी दि.१२ मे च्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले.

माकप नांदेडमध्ये दोन दिवशीय अभ्यास शिबीर घेण्यात येत असून दि.१३ मे रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरोचे सदस्य कॉ.डॉ. अशोक ढवळे हे शिबिरास मार्गदर्शन करणार आहेत. उपरोक्त जिल्हा अभ्यास शिबिरात निवडक शंभर महिला पुरुष कार्यकर्त्यांचा समावेश असून दि.१३ मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता शिबीराचा समारोप होईल.

विद्यापीठातील वस्तीगृहात पिण्याच्या पाण्याची सोय करा – एसएफआयचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी !

अभ्यास शिबीर यशस्वी करण्यासाठी माकप जिल्हा कमिटीचे सचिव कॉ.शंकर सिडाम, कॉ.अर्जुन आडे, कॉ.विनोद गोविंदवार, कॉ.किशोर पवार, कॉ.उज्ज्वला पडलवार, कॉ. प्रल्हाद चव्हाण, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.शिवाजी गायकवाड, कॉ.शैलीया आडे, कॉ.जनार्दन काळे, कॉ.मंजूश्री कबाडे आदी जिल्हा कमिटीचे नेतृत्व प्रयत्नशील आहे. तर शहर कमिटीचे सभासद कॉ. कॉ.करवंदा गायकवाड, कॉ. मारोती केंद्रे, कॉ.मीना आरसे, कॉ.लता गायकवाड आदींनी स्थानिक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

दोन दिवशीय चालणाऱ्या अभ्यास शिबिरात पुढील दुसऱ्या टप्यातील नेतृत्व तयार करणे हा उद्देश मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा असून त्यासाठीच या अभ्यास शिबीरासाठी माकपची सर्वोच्च कमिटी असलेल्या पॉलिट ब्युरोचे सदस्य कॉ. डॉ.अशोक ढवळे हे नांदेड येथे मार्गदर्शन करणार आहेत.

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, औरंगाबाद येथे विविध रिक्त पदांसाठी भरती

मोठी भरती : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत तब्बल 650 जागांसाठी भरती, 20 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय