Saturday, April 27, 2024
HomeNewsविमानाने धावपट्टीवरून उड्डाण करतानाच घेतला पेट

विमानाने धावपट्टीवरून उड्डाण करतानाच घेतला पेट

बीजिंग : चीनच्या चाँगकिंग शहरात आज सकाळी मोठा अपघात टळला. शहरातील विमानतळावर तिबेट एअरलाइनच्या विमानाला अचानक आग लागल्याची घटना घडली.

चीनच्या ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, तिबेट एअरलाइन्सचं विमान TV9833 पश्चिम चीनमधील चाँगकिंग जिआंगबेई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरून उड्डाण करत असताना विमानाच्या मुख्य भागातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागताच, विमान लगेच धावपट्टीवर उतरविण्यात आले. हे विमान चॉन्गकिंग वरुन तिबेटच्या ल्हासा येथे जाणार होते. या विमानात 113 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स होते. या अपघातील सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. तसेच 25 जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.

ब्रेकिंग : मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल ओतून कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मेगा भरती : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मध्ये तब्बल 922 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

या अपघाताचा व्हीडीओ व्हायरल झाला असून तिबेट एअरलाइन्सच्या विमानातून आग आणि काळा धूर निघताना दिसत आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येत असल्याचे विमान कंपनीने सांगितले आहे. 

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी चीनच्या इस्टर्न एअरलाइन्सचा भीषण अपघात झाला होता. यात चीनच्या इस्टर्न एअरलाइन्सचं विमान कोसळले होतं. यात 132 जणांचा मृत्यू झाला होता.

सोलापूर जिल्हा परिषदेत विविध पदांसाठी भरती, 20 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

सरकारी भरती : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय