Sunday, May 19, 2024
HomeNewsनागपूर : जनतेच्या खिशाला कात्री, हे आम जनतेचे बजेट नसून कार्पोरेट व...

नागपूर : जनतेच्या खिशाला कात्री, हे आम जनतेचे बजेट नसून कार्पोरेट व निवडणूक बजेट – देवेंद्र वानखडे

नागपूर : आज देशातील जनतेला आशा होत्या की पेट्रोल डिझेल स्वस्त होईल, ज्यामुळे माहागाई कमी होईल, इनकम टँक्स देणाऱ्यांना दिलासा मिळेल, शेतकरी आंदोलन करीत आहेत, शेतकऱ्यांसाठी मोठी तरतूद असेल. परंतु हे बजेट जनतेच्या खिशाला कात्री लावणारे असून कार्पोरेट व निवडणूक बजेट आहे, अशी टिका आम आदमी पार्टीचे विदर्भ समन्वयक देवेंद्र वानखडे यांनी केली आहे.

वानखडे म्हणाले, आजच्या अंंदाजपत्रकात अनेक घोषणा केल्याचे दिसून येते, परंतु वास्तविक तरतूद केल्याचे कुठेच दिसत नाही. विशेष करुन मीडिया मध्ये शेतकऱ्यांंसाठी मोठी तरतूद केल्याच्या हेडलाइन दाखविण्यात आल्या, परंतु एकूत बजेटच्या किती टक्के रक्कम शेती व शेतकरी यांच्यासाठी ठेवली आहे, याचा कुठेही उल्लेख नाही. गहु, कापूस, धान, दलहन खरेदीकरिता काही रक्कमेंची तरतूद दिसून येते, परंतु शेतीचा विकास कोणत्या मार्गाने केला जाईल याचा रोडमैप व त्यासाठी कुठलीच तरतूद केल्याचे दिसून येत नाही. उलट पेट्रोल डिझेल स्वस्त न करता कृषि विकास टँक्स लावण्यात आला आहे. यामुळे निश्चितपणे महागाई वाढत जाणार आहे.

शिक्षणाशिवाय देशाचा विकास संभव नाही, दर्जेदार व सर्वाना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाच्या खर्चात भरीव वाढ अपेक्षित होती, परंतु यामध्ये वाढ केल्याचे दिसून येत नाही. परंतु बंगाल, तमिलनाडु, आसाम व केरळच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करीत त्या राज्यातील मतदात्याला आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरतूद केल्याचे दिसून येते, हे सुद्धा 15 लाखाच्या निवडणूक जुमल्याप्रमाणे होऊ शकते. विशेष करुण मसूर, चना, किंवा इतर शेतमालावर कर लावून सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्यात आली आहे. देशातील युवकांना रोजगार मिळावेत यासाठी कुठलीही तरतूद नाही, आरोग्याच्या अंंदाजपत्रकात वाढ केली, परंतु तीही पुरेशी नसल्याचे दिसून येते. एकूणच हे अंंदाजपत्रक गरीब जनतेच्या खिशाला कात्री लावणारे आहे, असे वानखडे म्हणाले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय