Wednesday, May 8, 2024
Homeराज्यमुंबई : आदिवासी महिला मुख्याध्यापिकेचा छळ करणा-या आरोपीवर अॅस्ट्रासिटी दाखल होऊनही आरोपी...

मुंबई : आदिवासी महिला मुख्याध्यापिकेचा छळ करणा-या आरोपीवर अॅस्ट्रासिटी दाखल होऊनही आरोपी मोकाट, आरोपीला अटक करण्याची बिरसा क्रांती दलाची मागणी

मुंबई : सरला ठाकुर ह्या आदिवासी महिलेवर हल्ला करणाऱ्या अॅस्ट्रासिटीचा गुन्हा दाखल झालेल्या वैशाली देशपांडे यांना तात्काळ अटक अटक करा व शारीरिक व मानसिक छळ करणारे संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करा, अशी मागणी 

बिरसा क्रांती दलाचे कोकण विभाग प्रमुख व अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, मुंबई शहर व उपनगर बिरसा क्रांती दलाचे महिला फोरम जिल्हाध्यक्षा सुनिता गेंगजे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आदिवासी विकास मंञी अँड. के. सी. पाडवी, पोलीस महासंचालक मुंबई यांच्याकडे ईमेल निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, सरला संजय ठाकूर (कुमरे) रा. प्रतिक्षानगर (सायन) या शिक्षण साधना मंडळाचे “साधना विद्यालय सायन” येथे मुख्याध्यापिका पदावर कार्यरत आहेत. सरला ठाकुर ह्या आदिवासी समाजाच्या असल्यामुळे शिक्षण साधना मंडळाचे सचिव चंद्रकांत खोपडे हे विद्यालयातील शिक्षक कर्मचारी यांना हाताशी धरून सरला ठाकुर यांना कटकारस्थाने, षडयंत्र रचून खोट्या तक्रारी करणे, विनाकारण आरटीआय अर्ज टाकणे, असहकार सामूहिक सुट्ट्या घेणे, मोबाईल फेकणे, प्रशासकीय पञाचे तुकडे करुन तोंडावर फेकणे, जातीवाचक अश्लील शिविगाळ करणे, भरसभेत अश्लील भाषेत बोलून अपमानित करणे, हल्ला करून जखमी करणे, पदोन्नतीत डावलणे, सेवानिवृत्तासाठी जबरदस्ती करणे. इत्यादी प्रकारे नाहक प्रचंड शारीरीक व मानसिक छळ करीत आहेत. 

साधना विद्यालयातील सुपरवायझर शिक्षिकि वैशाली देशपांडे यांनी दि. 7 ऑगस्ट 2019 रोजी सरला ठाकुर यांच्यावर हल्ला चढवत बोटे पिरगळून नखाने हाताला बोचकले आहे व छातीवर दाब दिला आहे. त्यानंतर 100 नंबरवर संपर्क करून सरला ठाकुर यांनी पोलिसांना आपल्यावरील हल्ल्याची माहिती दिली आहे. तेव्हा सरला ठाकुर यांच्या तक्रारीकडे पोलीसांनीही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. व वैद्यकीय उपचारही करावून घेण्यासही टाळाटाळ केल्याचे दिसते. त्या हल्ल्यात सरला ठाकुर यांना गंभीर दुखापत होऊन जखमी झाल्यामुळे त्यांनी नाईलाजाने सायन हास्पीटलमध्ये वैद्यकीय उपचार घेतले आहेत. व वैद्यकीय रिपोर्ट सादर केलेला आहे.

तब्बल 14 महिन्यानंतर  दि 13 ऑक्टोबर 2020 रोजी वैशाली देशपांडे यांच्या वर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅस्ट्रासिटी) नुसार फौजदारी दखलपात्र  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अद्यापही अटक करण्यात आली नाही.

दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच शिक्षण साधना मंडळाचे उपसचिव चंद्रकांत खोपडे यांच्या सह दोषारोपीत व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सुशीलकुमार पावरा यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय