Saturday, May 18, 2024
HomeNewsपक्षीय राजकारणापेक्षा जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे हाच माझा जाहीरनामा

पक्षीय राजकारणापेक्षा जनतेच्या आकांक्षा पूर्ण करणे हाच माझा जाहीरनामा

जनतेने मला मतदान करावे-अपक्ष उमेदवार अजय लोंढे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.22
-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आंबेडकरी चळवळीतील तरुण सामाजिक कार्यकर्ते अजय हनुमंत लोंढे हे सुविद्य तरुण उमेदवार नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. ऑटो रिक्षा हे निवडणूक चिन्ह त्यांना मिळाले आहे.

गेली 20 वर्षे शहरातील विविध मागण्यांसाठी त्यांनी प्रशासनास निवेदने दिली आहेत.लक्षवेधी आंदोलने करून त्यांनी श्रमिक जनतेचा निवारा हक्क,नियमित पाणी पुरवठा,विजेचा तुटवडा,मनपा शाळा सेमी इंग्लिश करा.खेळाची मैदाने ईई अनेक नागरी समस्या विधानसभा पटलावर त्यांना मांडायच्या आहेत.
या प्रचाराच्या दरम्यान ते म्हणाले की,सत्ता संपत्ती,धनशक्ती द्वारे प्रस्थापित पक्ष मतदारांवर भुरळ पाडत आहेत.
जनतेने मागील दहा वर्षात भाजप सह राष्ट्रवादी ईई सर्वांना संधी दिली आहे.
स्मार्ट सिटी मध्ये फक्त निवडक रस्ते चकाचक केले म्हणजे विकास नाही.
इथे 2 लाखाहून जास्त श्रमिक बेघर आणि भाड्याच्या घरात कैक वर्षे रहात आहेत,त्यांना अद्यापही घरे मिळालेली नाहीत.
लाखो रुपयांची कर्जे घेऊन निवासी सदनिकामध्ये रहात असलेल्या मध्यमवर्गाला टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.भरमसाठ शास्तीकर लावून हजारो कुटुंबावर अन्याय केला आहे.

या शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य,मध्यमवर्गीय जनतेचा प्रतिनिधी म्हणून चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढवत आहे.जनतेने मला भरगोस मतदान करून विजयी करावे,असे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय