Mumbai : नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणूकीत भाजपने पुन्हा एकदा सरकार स्थापन केले असले तरी भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करण्यात अपयश आले आहे. तसेच अनेक ठिकाणी भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. अशात आता भाजप आमदाराने एक हिंदू राष्ट्राबाबत एक मोठं विधान केले आहे. ज्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. (Mumbai)
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात भारतीय जनता पक्षाने 400 पारचा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात भाजपाला 240 तर एनडीएला 293 जागा मिळाल्या आहेत. भाजप आणि एनडीएला मिळालेल्या जागांवरून विरोधी पक्षांकडून भाजप निशान्यावर आहे. अशात आता भाजपचे हैदराबादमधील आमदार टी. राजा सिंह यांनी भिवंडीत एका कार्यक्रमात बोलताना एनडीएला 400 पार जागा मिळाल्या असत्या, तर भारत हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं, असं विधान केलं आहे. टी. राजा सिंह यांच्या या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भिवंडीत हिंदू धर्मसभा व संत संमेलन याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या या धर्मसभेला टी. राजा सिंह हे भाजपा आमदार उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाषणामध्ये अनेक दावे व विधानं केली. ते म्हणाले, राजकारणी नेत्यांशिवाय हिंदू राष्ट्र घोषित होऊ शकत नाही. यावेळी निवडणुकीत जर आपण 400 पेक्षा जास्त जागा जिंकल्या असत्या, तर हिंदू राष्ट्र घोषित झालं असतं. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत हिंदू राष्ट्रासाठी प्रयत्न करत राहीन. पुढे ते म्हणाले, हिंदूंनी महाराष्ट्रात आपल्या सरकारचे व एकनाथ शिंदेंचे हात बळकट करायला हवेत. असे म्हणतं तुमच्या आजूबाजूला काही सेक्युलर किडे बसले आहेत, असेही टी. राजा म्हणाले.
अमोल मिटकरींचा पलटवार
महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी टी. राजा सिंह यांच्यावर पलटवार करत म्हटले आहे की, टी. राजा ला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावं! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! “ग्लानिर्भवती ” “भारत” हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी राजा विसरला असावा.#भारतराष्ट्र
हेही वाचा :
मोठी बातमी : EVM मशीन AI द्वारे हॅक होऊ शकते इलॉन मस्क यांच्या दाव्याने खळबळ
ब्रेकिंग : महाविकास आघाडीचा मोठा निर्णय, भाजपची डोकेदुखी वाढली
PCMC : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
ब्रेकिंग : भारतीय तटरक्षक दलात 320 पदांची मोठी भरती
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 164 पदांची भरती
ब्रेकिंग : अग्निवीर योजनेबाबत केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी सरकार ऍक्शन मोड मध्ये
सिक्किममध्ये तिस्ता नदीचा कहर, अनेक भाग पाण्याखाली; 1500 पर्यटक अडकले!
ब्रेकिंग : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची, बातमी शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय
अंघोळीच्या साबणाचे तुकडे फेकून देताय ? असा करा उपयोग, हा व्हिडिओ तुमच्यासाठी
ब्रेकिंग : मोफत आधार कार्ड अपडेट संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ