Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडबहुगुणी चवदार डोंगरची काळी मैना बाजारात

बहुगुणी चवदार डोंगरची काळी मैना बाजारात

पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर: मावळखोऱ्यातील चवदार काळ्या तांबूस रंगांची करवंद विक्रीसाठी शहरात दाखल झाली आहेत. डोंगरची काळी मैना या नावाने प्रसिद्ध असलेली ही छोटी फळे जंगलात वाढलेली असतात. खायला गोड व उन्हाळ्यातील वैशाख वणव्यात दिलासा देणारी ही फळांची आवक पिंपरी,आकुर्डी,चिंचवड च्या मंडईत सुरू झाली आहे.

मावळच्या खांडी, कुसवली, कार्ला, कामशेतच्या डोंगरी भागातील जंगलातील या फळांना शहरात मागणी वाढली आहे. भोर ,वेल्हे, मुळाशी भागातून हिंजवडीच्या आयटी परिसरात वडाच्या पानाच्या द्रोण मध्ये याची किरकोळ विक्री ९० ते १२० रु प्रतिकिलो आहे. गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ६०० ठेव ७५० रु दराने १० किलोचे पॅक उपलब्ध झाले आहेत.

कोकणातील मंडणगड, महाड, माणगाव तालुक्यातून पुणे, पिंपरी चिंचवड मध्ये करवंदाची आवक सुरू झाली आहे. नाशिवंत फळ असले तरी क जीवनसत्व युक्त या फळाचा आस्वादामुळे उन्हाचा दाह, पित्त, मळमळ कमी होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय