Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडआळंदी एमआयटी महाविद्यालयात गणित संशोधन केंद्र

आळंदी एमआयटी महाविद्यालयात गणित संशोधन केंद्र

आळंदी/अर्जुन मेदनकर: येथील एम.आय.टी. कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात गणित विषयाचे संशोधन केंद्र सुरु करण्यास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा कडून मान्यता मिळाली आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी दिली. महाविद्यालय एम.एस.सी (इंडस्ट्रियल म्यॅथ्यमॅटिकस कम्प्युटर अँप्लिकेशन) सह संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, वाणिज्य व जनसंवाद पत्रकारिता, या स्वरूपाचे अनेक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. या संशोधन केंद्र मुळे महाविद्यालयातील विध्यार्थी यांना गणिताच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

गणितीय ज्ञानाच्या प्रगतीला आणि वास्तविक जगाच्या समस्यांसाठी नाविन्यपूर्ण उपायांना प्रोत्साहन, संशोधकांना जटिल गणिती समस्यांचा सखोल अभ्यास करण्यास आणि विविध क्षेत्रांमध्ये व्यावहारिक अनुप्रयोग असलेले नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यास सक्षम करण्यास तसेच समाज आणि देशाच्या प्रगती मध्ये योगदान देण्यासाठी या संशोधन केंद्रचा मुख्य उद्देश असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे यांनी सांगितले. महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर सुविधा आहे. या संशोधन केंद्राची स्थापना हे महाविद्यालयसाठी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचे गणित विभागाचे प्रमुख डॉ.प्रदीप पानसरे यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय