पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली जाधववाडी प्रभागात सेवा रस्त्याची विकास कामे करताना पावसाळी पाणी (Storm water) जोडणी न केल्यामुळे विविध सेवा रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. डांबरीकरण केलेल्या सावता माळी मंदिराच्या मागील बाजूच्या मोठ्या रहदारीच्या रस्त्यावर गुडघाभर पाणी तुंबले आहे. सदर ठिकाणी सार्वजनिक गार्डनच्या बाजूला असलेल्या स्टॉर्म वॉटर पाईपलाईनला रस्त्यावरील मुसळधार पावसात साचणारे पाणी जोडले नाही. या बाबत प्रभाग अधिकाऱ्यांना मे 2023 मध्ये निचरा व्यवस्थापन करावे अशी विनंती केली होती.
प्रशासनाच्या दुर्लक्ष झाल्यामुळे रहदारीच्या वेळी गुडघाभर पाण्यातून गाड्या दुचाकी चालवताना पाणी अंगावर उडत आहे, पावसाच्या पाण्याचे निचरा व्यवस्थापन हा पायाभूत सुविधांचा एक महत्वाचा भाग आहे.साचत असलेल्या पावसाच्या पाण्याला स्टॉर्म वॉटर लाईनला जोडले नाही तर मुसळधार पावसात रस्त्यावरील रहदारी बंद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी, कामगार, महिलांना तुंबलेल्या पाण्यातून जाताना दुचाकी चालवताना अपघात होऊ शकतो.सदर रस्त्यावर तातडीने निचरा व्यवस्थापन करावे, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे चिखली जाधववाडी येथील विभाग प्रमुख राजू भुजबळ यांनी केली आहे.
विकासकामे उरकण्याची घाई केली जात आहे
निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासकीय राजवटीत ठेकेदार रस्त्याची कामे उरकून घेतात. कामे उरकायची घाई झाली आहे.त्यांच्या कामात तांत्रिक चुका, त्रुटी होऊ नयेत यासाठी गुणवत्ता तपासणी केली जात नाही, आणि रस्ते तुंबतात, असे चिखली मोशी उपविभाग प्रमुख मोहन रणदिवे म्हणाले.
पावसाळ्यात प्रशासनाने दुर्लक्ष करू नये
येथील रहिवासी संतोष पवार म्हणाले की, पाणी तुंबले की,त्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. साथीचे आजार पसरू शकतात. नगरसेवक व लोकप्रतिनिधीचा कार्यकाळ संपल्यामुळे प्रशासन एकतर्फी विकास कामे करत आहे. सरकारने लवकर निवडणूका घेऊन पालिकेचा कारभार लोकाभिमुख केला पाहिजे.
‘ट्रॅक कंपोनन्ट्स’च्या कामगारांना तब्बल साडेबारा हजारांची वेतनवाढ !
ज्येष्ठ नागरिक त्रिवेणीनगर संघाचा 14 वा वर्धापन दिन संपन्न
संभाजी ब्रिगेडच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन