Thursday, May 2, 2024
HomeNewsस्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चिखलीत कबड्डी स्पर्धा

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त चिखलीत कबड्डी स्पर्धा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: शिवसेनाप्रमुख,स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना युवासेना पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या वतीने हिंदुह्रदयसम्राट कबड्डी चषक २०२३ चे आयोजन चिखली येथे करण्यात आले होते,सदर स्पर्धेचे आयोजन विभागप्रमुख.श्री.नितीन बोंडे व उपविभागप्रमुख प्रविण धोंडाप्पा पाटील यांनी तसेच शिवसेना युवासेना शाखा ताम्हाणेवस्ती,म्हेत्रेवस्ती,रूपीनगर,त्रिवेणीनगर,मोरेवस्ती यांनी केले होते.

सदर स्पर्धेसाठी आमदार,पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिनभाऊ अहिर, भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील,युवासेना विस्तारक निलेश बडदे,शहरप्रमुख सचिन भोसले,जिल्हा संघटिका सुलभाताई उबाळे,भोसरी विधानसभाप्रमुख धनजंय आल्हाट व इतर पदाधिकारी,मान्यवर उपस्थित होते, या स्पर्धेत प्रथम बक्षिस क्रांती मित्र मंडळ कबड्डी संघ(पिंपळेगुरव), द्वितीय बक्षिस श्री फत्तेचंद जैन कबड्डी संघ(चिंचवडगाव), तृतीय बक्षिस भैरवनाथ कबड्डी संघ(भोसरी) यांनी पटकवले, या स्पर्धेसाठी बक्षिस सौजन्य नेताजी काशिद,संतोष सौंदणकर,सुजित तांबोळी,शशिकांत पाटील,सतिश मरळ,दादाराव ठाकरे,सुर्यकांत देशमुख यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सर्जेराव कचरे व शतृघ्न गोडगे यांनी आभार मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय