MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयबीपीएस आणि एमपीएससीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २५ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी आयोजित करण्यात आल्या होत्या, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. या परीक्षांच्या तारखांची सांगड बसविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता.
पुण्यातील शास्त्री रोडवर विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी शरद पवार गटाचे नेते रोहित पवारही आंदोलनात सहभागी झाले होते. या घटनेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर एमपीएससीने पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. MPSC
एमपीएससीने गुरुवारी सकाळी १० वाजता झालेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार २५ ऑगस्टला होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ पुढे ढकलण्यात आली आहे. आयोगाने लवकरच या परीक्षेची सुधारित तारीख जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्य शासनाच्या सेवेतील विविध संवर्गातील पदांची भरती करण्यासाठी यापूर्वीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती, आणि २५ ऑगस्ट रोजी ही परीक्षा आयोजित करण्याचे नियोजित होते. परंतु, विद्यार्थ्यांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका लांबणीवर, वाचा काय आहे कारण !
सोयाबीनवरील विषाणुजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या किडींचे व्यवस्थापन
श्री विलेपार्ले केळवणी मंडळ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, धुळे अंतर्गत भरती
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती