Wednesday, May 8, 2024
Homeजुन्नरखासदार अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंना अल्टिमेट... 

खासदार अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्री शिंदेंना अल्टिमेट… 

जुन्नर : किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज असावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘भगवा जाणीव आंदोलन’ केले. हे आंदोलन कोणाला विरोध करण्यासाठी नव्हते, तर जाणीव निर्माण करण्यासाठी केले असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव किल्ले शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात साजरा होतोय मात्र ज्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडावर जन्मोत्सव साजरा होतोय त्याच ठिकाणी भगवा ध्वज नाही, अशी खंत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

पुढल्या शिवजयंतीला शिवनेरीवर भगवा नसेल तर, राज्यव्यापी आंदोलन केले जाईल. राज्य सरकारने यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन क्रेंद्रशासनातून यासाठी लवकरात लवकर परवानगी मिळवावी. जे सरकार कलम ३७० हटवतं तर आर्केलॉजीकल सर्वे ऑफ इंडियाच्या नियमामध्ये एक छोटा बदल करून भगवा का फडकवू शकत नाही ?, असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी भगवा फडकवला जावा याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, अद्यापही राज्य सरकारने त्या दिशेने ठोस पाऊलं उचलेली नाहीत. त्यामुळे खासदार अमोल कोल्हे यांनी आता राज्यशासनाला पुढील शिवजयंती पर्यंतचा अल्टीमेट दिला आहे.

Lic
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय