Friday, November 22, 2024
Homeराष्ट्रीयTariff Hike : मोबाईल रिचार्जमध्ये मोठी वाढ, कंपन्यांकडून नवे दर जाहीर

Tariff Hike : मोबाईल रिचार्जमध्ये मोठी वाढ, कंपन्यांकडून नवे दर जाहीर

नवी दिल्ली : देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी जिओने आपल्या 5G प्लानच्या किंमती वाढवल्यानंतर एअरटेल सह व्होडाफोनने देखील आपल्या विविध प्लानच्या नव्या किंमतीत दरवाढ केली आहे. ही दरवाढ येत्या 3 जुलैपासून लागू होईल. Tariff Hike

टेलिकॉम कंपन्यांनी 5G सेवा सुरू केल्यानंतर रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली आहे. भारतातील दूरसंचार कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत व्यवसाय मॉडेल सक्षम करण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे, असे टेलिकॉम कंपन्यांनी म्हटले आहे. एप्रिल 2024 पर्यंत 117 कोटी ग्राहकांसह भारतातील दूरसंचार उद्योग जगातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. Tariff Hike

जिओचे सर्व नवे प्लॅन्स जाहीर झाले आहेत, 209 चा 1GB/Day 28 दिवसांसाठीचा प्लॅन आता 249 रुपये करण्यात आला आहे. 299 चा 2GB/Day 28 दिवसांसाठीचा प्लॅन आता 349 रुपये करण्यात आला आहे.

त्याच बरोबर एअरटेलने आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेट अशा दोन्ही 5G प्लानच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. प्रीपेड अनलिमिटेड व्हॉईस प्लानची किंमत 179 रुपयांऐवजी 199 रुपये केली आहे. तर, 455 रुपयांच्या प्लानची किंमत 509 रुपये आणि 1779 रुपयांच्या प्लानची किंमत 1999 रुपये करण्यात आली. Mobile Tariff Hike

याआधीही टेलिकॉम कंपन्यांनी काही योजनांमध्ये सुधार केला होता. पण यावेळी संपूर्ण पोर्टफोलिओ बदलण्यात आला आहे. त्यामुळे आता रिचार्ज प्लॅनसाठी आता जास्त पैसे मोजावे लागतील.ही दरवाढ येत्या 3 जुलैपासून लागू होईल. या दरवाढीचा कोट्यवधी ग्राहकांना फटका बसणार आहे.

खरेतर, या कंपन्यांनी गेल्या वेळी डिसेंबर 2021 मध्ये दर वाढवले होते. त्यानंतर, टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रम खरेदी केले आणि 5G सेवा सुरू केल्या, ज्यामध्ये कंपन्यांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागली आहे. Tariff Hike

कंपन्या निवडणुका संपण्याची वाट पाहत होत्या. लोकसभा निवडणुका संपल्यानंतर मोबाईल कंपन्यांनी केलेली दरवाढ ग्राहकांना चांगला झटका देणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

दुर्बल घटकांसाठी वाचा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा केल्या !

प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात महावितरणचा मोठा निर्णय

दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

संबंधित लेख

लोकप्रिय