गणपतीपुळे : बिपरजॉय आणि मान्सूनचे आगमन यामुळे गणपतीपुळ्यातील समुद्राला उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळाले. समुद्राच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे समुद्राच्या लाटा किनाऱ्यावर धडकल्याने दुकानदारांना फटका बसला. दुकानात पाणी शिरून सामान तसेच दुकानदारांचे पैसे वाहून गेले. तसेच पर्यटकांचे सामान आणि मोबाइल फोन समुद्राने आपल्या पोटात ओढून घेतले. तर काहींना गंभीर दुखापतही झाली आहे.
गणपतीपुळे येथे पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. पर्यटक अतिउत्साह दाखवत खोल समुद्रात उतरतात आणि जीव धोक्यात घालतात. बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाण्यात उतरू नका, अशा सूचना जाहीर केल्या होत्या. परंतु सूचनांचे पालन न करता मुलाबाळांसह पाण्याचा आस्वाद घेण्यालाठी पर्यटक पाण्यात उतरले होते.
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ होऊन एका अजस्त्र लाटेत रविवारी १० ते १५ पर्यटक जखमी झाले आहेत. जखमीत बायकांचे प्रमाण अधिक आहे. त्यांना रुग्णवाहिका, स्वतःच्या वाहनातून, रिक्षा यातून उपचारासाठी प्राथमिक उपचार केंद्र, मालगुंड तर काहींना रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
हे ही वाचा :
भटक्या जमाती, धनगर व तत्सम लाभार्थ्यांसाठी मेंढी-शेळी पालन अर्थसहाय्य योजना सुरु करणार
बारावीची फेर परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला ‘हा’ निर्णय
ब्रेकिंग : CET चा निकाल लागला ! असा चेक करा
आळंदीत लाठीचार्ज झाला नसून केवळ बाचाबाची – गृहमंत्री फडणवीस
ब्रेकिंग व्हिडिओ : आळंदीत पोलिसांचा वारकऱ्यांवर लाठीचार्ज
ब्रेकिंग : पुणे – सातारा महामार्गावर 4 वाहनांचा विचित्र अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 प्रवासी जखमी
बॉलीवूडला धक्का : प्रसिध्द अभिनेत्याचे निधन
नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा – राज्यपाल रमेश बैस
आषाढी वारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, अशा असणार सोयी-सुविधा