प्रतिनिधी :- पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील गोहे खु. या गावातील आदिवासी नागरिकांना लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. त्यामुळे मनरेगा अंतर्गत गावातच काम उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कामची गरज असणाऱ्या २४ मजूरांनी ग्रामसेवकांकडे २९ मे रोजी कामाची मागणी केली होती. परंतु १५ दिवस होऊ गेले तरीही गावात काम उपलब्ध करून देण्यात आले नव्हते, १५ दिवसानंतर वन क्षेत्रात काम उपलब्ध करुन देण्यात आले होते. परंतु ते ५ – ६ किलोमीटर अंतरावर होते. तेथे चालत जाण्यासाठी किमान १ तास लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांनी ते काम नाकारले आहे.
गावपातळीवर कामाची उपलब्धता ग्रामपंचायतीने करुन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. एकीकडे कोरोना सारखी भयान परिस्थिती असताना अनेकांना कामाची नितांत गरज आहे. अशा परिस्थिती मनरेगातून लोकांना कामे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद पुढाकार घेत आहे. परंतु स्थानिक प्रशासन कानाडोळा करत आहे.