Friday, November 22, 2024
Homeराज्यहवामान विभागाचा राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी पाऊसासह गारपिटीचा इशारा

हवामान विभागाचा राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट, वादळी पाऊसासह गारपिटीचा इशारा

पुणे : राज्यभरातील हवामानात सध्या बदल झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात काल दिवसभर विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. आज शनिवारी पुन्हा राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात उन्हाच्या झळा असह्य होत असताना हवामान विभागाने राज्यातील वादळी पाऊस, गारपिटीचा इशाऱ्यासह यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग दोन जिल्ह्यात पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यातही वादळी पावसासह गारपिट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भातील अकोला जिल्ह्यात वादळी पावसासह जोरदार झालेल्या गारपीटीने कांदा, लिंबू व खरबूज आदी पिकांचे मोठे नुकसान झाले.

संबंधित लेख

लोकप्रिय