कुसवली (मावळ) येथे वुई टुगेदर फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीने दिवाळी फराळ कपडे वितरण (Maval)
पुणे / क्रांतीकुमार कडुलकर – २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची एकूण लोकसंख्या ११ कोटी २३ लाख इतकी असून त्यापैकी आदिवासी जमातींची संख्या १ कोटी ५ लक्ष इतकी आहे. ही राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ९.३५% इतकी आहे. भारताच्या एकूण आदिवासी जमातीच्या लोकसंख्येपैकी महाराष्ट्रात असणाऱ्या आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण १०% इतके आहे. (Maval)
यातील बहुसंख्य आदिवासी पश्चिम घाट वनक्षेत्रात राहतात. आधुनिक शहरापासून अतिशय दुर्गम डोंगरी भागात राहणाऱ्या आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजना आहेत, त्याचे लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी ‘वुई टुगेदर फाउंडेशन’ आणि येथील स्थानिक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकारी यंत्रणा यांनी समन्वय साधून त्यांना प्राथमिक आरोग्य सुविधा, शिक्षण, पोषण आहार आदी सोयी सुविधा मिळवून देण्याचे मिशन वर्क सुरू केल्यास कामगार संघटना आर्थिक आणि इतर सहाय्य मिळवून देतील, असे आश्र्वासन ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशनचे (AIDEF) खजिनदार , कामगार नेते कॉम्रेड मोहन होळ यांनी कुसवली, मावळ येथील एका कार्यक्रमात आश्र्वासन दिले. (Maval)
वुई टुगेदर फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, चिखली प्राधिकरण (PCMC) त्यांच्या वतीने कुसवली, मावळ येथे आदिवासी, दलीत, शेतमजुरांना दिवाळी फराळ, साड्या पँट पीसचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
वुई टुगेदर फाउंडेशन (We together foundation) आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित), राजे शिवाजीनगर, चिखली, पिंपरी चिंचवड या सेवाभावी संस्थांनी कुसवली येथील कडूबाई माता मंदिर येथे १८० माता, भगिनी,शेतमजूर बांधव, मुलामुलींना श्री स्वामी समर्थ यांचा प्रसाद म्हणून दिवाळी फराळाचे वाटप केले, तसेच वुई टुगेदर फाउंडेशनच्या सदस्यांनी नव्या साड्या, शर्ट पीस पँट पीसचे वितरण केले.
जल,जंगल, जमीन राखणारे आदिवासी निसर्गाचे, शेतीचे संवर्धन करतात – सेवेकरी शिवाजीराव साधुले
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून गुरू माऊली दादासाहेब मोरे, सतीश दादा मोटे, महेश पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात आमची ग्रामीण भागात कृषी, शिक्षण, बाल संस्कार आणि आरोग्य सेवा केंद्रे काम करतात, आम्ही सर्व सेवेकरी शहरात आमच्या नोकऱ्या, कामधंदा सांभाळून गोरगरीब जनतेला मदत करत असतो. या दुर्गम भागात आम्ही आरोग्य सेवा केंद्र सुरू करू, आदिवासी, ग्रामीण मजूर कुटुंबांना शासकीय नियमानुसार पोषक आहार तसेच व्हिटॅमिन युक्त औषधे देऊ. त्यांची आरोग्य तपासणी करू, जल,जंगल, जमीन राखणारे आदिवासी निसर्गाचे, शेतीचे संवर्धन करतात, ते निसर्ग मित्र आणि ईश्वराचे भक्त आहेत, आम्ही कुसवली येथे सेवा देऊ, असे आश्र्वासन सेवेकरी शिवाजीराव साधुले यांनी दिले आहे.
आरोग्य सेवा केंद्र सुरू करा – बळीराम शिंदे
कुसवली मावळ आदिवासी सेवा आणि सक्षमीकरण केंद्र संचालक (वुई टुगेदर फाउंडेशन) बळीराम शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून मावळ आदिवासी बहुल गावांची माहिती देताना सांगितले की, येथील लोक मुख्य आधुनिक आणि शहरी वातावरणापासून खूप दूर आहेत, येथील वाड्या, वस्त्यांवर आणि तांड्यावर राहणारे आदिवासी भात कापणीच्या हंगामात मजुरी करतात, पावसाळ्यात येथे कामे नसतात, त्यामुळे येथे गरिबी आहे, शिक्षणापासून वंचित राहिल्यामुळे इथे अंधश्रद्धा आहेत. महिला आणि मुले यांच्यात कुपोषण जास्त आहे.
येथे आरोग्य सेवा केंद्र सुरू करण्यासाठी आम्हाला मदत मिळाली तर आम्ही त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करू.
विद्यार्थी दत्तक योजना सुरू करणार – सोनाली मन्हास
वुई टुगेदर फाउंडेशनच्या सदस्या सोनाली मन्हास यांनी प्रास्ताविक करताना संस्थेची माहिती देताना सांगितले की, वुई टुगेदर फाऊंडेशन मधील आमचे सर्व सहकारी सदस्य, देणगीदार यांची सामाजिक बांधिलकी आणि गोरगरीब लोकांना मदत करण्याची पवित्र भावना आहे, निवृत्त आणि ज्येष्ठ नागरिक तसेच स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी इथे आपल्याला दिवाळी भेट देण्यासाठी आले आहेत.
येथील गोर गरीब मुलांना शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच आमची इच्छा आहे.
संस्थेने शैक्षणिक दत्तक योजना सुरू केली आहे, येथील कार्यकर्त्यांनी मुलामुलींचा सर्व्हे करून गरजू विद्यार्थांना सर्व शालेय साहित्य आम्ही जून २०२५ च्या नव्या शैक्षणिक वर्षापासून देऊ असे आश्वासन दिले.(Maval)
कुसवली येथील कडुबाई माता मंदिरात आदिवासी, दलीत आणि शेतमजूर माता भगिनींना दिवाळी फराळ,साड्या, शर्ट आणि पँट पीसचे वितरण दिवाळी भेट निमित्ताने करण्यात आले.
खडकी येथील सेंट्रल ए.एफ.व्ही. डेपो एम्प्लॉइज को – ऑपरेटिव्ह सोसायटीचे डायरेक्टर अभिनंदन गायकवाड यांनी आदिवासी युवकांसाठी शर्ट आणि पँट पीस भेट दिले होते.
या वेळी मोठ्या संख्येने लाभार्थी आणि संस्थेचे स्वयंसेवक देणगीदार उपस्थित होते.
कुसवली येथील दि.१० नोव्हेंबर रोजी आयोजित कार्यक्रमाला खालील सदस्य उपस्थित होते. त्यांच्या हस्ते भेटवस्तु वितरण करण्यात आले.
सर्वश्री मोहन होळ, वर्षा मोहन होळ, अनिल शिंदे, लता अनिल शिंदे, रणजीत सोमवंशी, निशा सोमवंशी, कुमारी वर्णिका, सुरेंद्र जगताप, उज्वला जगताप, दारासिंग मन्हास, सोनाली मन्हास, सलीम सय्यद, मैमुना सय्यद, दिलीप पेटकर, के रंगा राव, जयंत कुलकर्णी, विलास गटने, राजेंद्र काळे, दिलीप चक्रे, श्रीकांत पाटणे, सदाशिव गुरव उद्योजक परमानंद सोनी, रवींद्र शेटे, सामाजिक कार्यकर्त्या सीता केंद्रे, राजीव सुभेदार, ऍड. विलास कडेकर, ऍड.अपर्णा अष्टीकर, सोनाली कदम, राहुल ठाकूर, निखिल कुलकर्णी, शुभदा मराठे, साधना बापट या सदस्यांच्या हस्ते दिवाळी फराळ, साड्या आणि शर्ट, पँट पीस चे वितरण करण्यात आले.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, चिखली प्राधिकरणचे योगदान कौतुकास्पद – जयंत कुलकर्णी
वुई टुगेदर फाउंडेशनचे सचिव जयंत कुलकर्णी यांनी यांनी सर्व उपस्थित ग्रामस्थ मंडळी आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांचे आभार व्यक्त करताना स्वामी समर्थ भक्त महेश पोळ, राजेंद्र अब्दागिरे, शिवाजीराव साधुले, प्रवीण कर्णेकर यांचे कौतुक केले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दरवर्षी आदिवासी लोकांना दिवाळी फराळ भेटवस्तु देत असते, याचा उल्लेख करून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे म्हटले.
तसेच संयोजक बळीराम शिंदे यांचे सह सरपंच चंद्रभागा दाते, नाथा किसन चिमटे, किरण शिंदे, हरिभाऊ शिंदे, गुलाब संतू शिंदे, रमेश शिंदे, सुशांत शिंदे, नवनाथ काळू चिमटे, सुरज गवारी, अंकुश डोळस, सदू चिमटे, बारक्या मोरमारे, नाथा वारे, राघू चिमटे, श्रीरंग चिमटे, विशाल चिमटे, अशोक चिमटे, सुखदेव शिंदे सार्थक कदम, बाळू दाते
सरपंच संतोष वारे, सोमनाथ चिमटे, बाळू दाते, संतोष वारे , सोमनाथ चिमटे, आदी सर्व स्थानिक मान्यवरांचे आभार मानले.