Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडMaval loksabha : बिजलीनगर, चिंचवड भागात संजोग वाघेरेंचा गावभेट दौरा               

Maval loksabha : बिजलीनगर, चिंचवड भागात संजोग वाघेरेंचा गावभेट दौरा               

हस्तांदोलन, सेल्फी अन शुभेच्छांनी वाढला गावभेट दौऱ्याचा उत्साह !
                                                                                                  पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : गद्दारांना गद्दारी काय असते याचा धडा शिकविण्यासाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व कार्यकर्ते व सामान्य मतदार आता सज्ज झाला असून आता त्यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब करण्यासाठी वाट पहावी लागणार असल्याचे संजोग वाघेरे-पाटील (Sanjog Waghere Patil) यांनी सांगितले. maval

सोमवारी (दि. 8) सकाळी झालेल्या वाल्हेकरवाडी – रावेत (PCMC) गावभेट दौऱ्यात ते मतदारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी विश्वास व्यक्त केला. या वेळी सेल्फी, हस्तांदोलन अन शुभेच्छांनी गावभेटी दौऱ्याचा उत्साह वाढला होता. maval

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) मुख्य प्रवक्ते माधव पाटील, सागर चिंचवडे, गणेश भोंडवे, कामगार आघाडीचे संदीप शिंदे, राहुल धनवे, आम आदमी पार्टीचे शहर संघटक सचिन पवार, कमलेश रनावरे, वैजनाथ शिरसाठ, रोहित सरनोबत, भरत दास, दगडूछ मरळे, माथाडी कामगार संघटनेचे हनुमंत तरडे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाघेरे पाटील म्हणाले की, तरुणांना नोक-या नाहीत आजचा तरुण बेरोजगार झाला आहे. देश देशोधडीला लागला आहे, शेतक-यांचा विषय गंभीर आहे. कामगारांना न्याय मिळत नाही त्यामुळे मतदारांनी जागे झाले पाहिजे. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. शहरी आणि गावातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी मी पूर्ण पर्यंत करणार असल्याचे मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे (maval loksabha 2024) उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, मतदारांकडून आणि जेष्ठ नागरिक, तरुणांकडून उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे मनापासून स्वागत केले. अडीअडचणीत असलेल्या सर्वसामान्यांना मदतीचा हात देणारं नेतुत्व आणि समाजाची असलेलं नाळ अश्या भावना या वेळी मतदारांनी व्यक्त केल्या.

अन् चिमुकलीने उमेदवार वाघेरे पाटलांना भरविला पेढा…
बिजलीनगर येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे  गावभेट दौरा करीत असताना एका लहान चिमुकलीने हि त्यांचे औक्षण करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी मतदार अक्षरशा भारावून गेले होते. वाघेरे पाटील यांच्यातील असलेला जीवाळा आणि प्रेम पाहून चिमुकलीने त्यांना पेढा भरविला. PCMC NEWS

गावभेटी दरम्यान काय म्हणाले मतदार…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचे मुद्देसूद पण सर्व सामान्य नागरिकाशी थेट बोलतात, समाजसेवेला प्रथम प्राधान्य देणारा, सर्व स्तरातील लोकांना आपुलकीने वागणे, एकदम साधी राहणीमान, यामुळे वाघेरे यांच्याभोवती लोकांचा घोळका जमा होत होता, असे चित्र या वेळी पहावयास मिळत होते. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघातील मतदार संजोग वाघेरे पाटलांच्याच गळ्यात विजयाची माळ घालणार आणि स्वाभीमानी विचाराच्या शिवसेनेचा शिलेदार म्हणून त्यांना लोकसभेत पाठविणार आहोत, अशी भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली. PCMC NEWS

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

पुण्यात नोकरी शोधताय? सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

मोठी बातमी : अजित पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षांवर हल्ला, राष्ट्रवादी भाजपविरोधात आक्रमक

भरदिवसा पृथ्वीवर होणार तब्बल ४ मिनिट अंधार, वाचा काय आहे कारण !

धक्कादायक : ‘तुम्ही दोघे वेगवेगळ्या धर्माचे असताना एकत्र का फिरता’ म्हणत पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांना मारहाण

निवडणूक आणि प्रचार ; राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

मुद्रीत माध्यमाच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्या ४ जणांना नोटीस, १३ जणांचा शोध सुरू

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय