Ghodegaon : आदिम संस्कृती अभ्यास, संशोधन व मानव विकास केंद्र, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आंबेगाव तालुका समिती (Ghodegaon) यांच्या संयुक्त विद्यमाने घोडेगाव येथे शहीद दिन साजरा करण्यात आला.
भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देण्याऱ्या भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या स्मर्णार्थ देशभरात शहीद दिवस साजरा केला जातो. २३ मार्च रोजी इंग्रजांनी भगत सिंग, राजगुरु आणि सुखदेव या भारतमातेच्या वीर जवानांना फाशी दिली होती. त्यांच्या या बलीदानामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा मिळाली. त्यामुळेच आजचा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो.
शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. शहिदांच्या जीवनावर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलताना प्रा.स्नेहल साबळे यांनी सांगितले की, ‘शहीद भगतसिंग यांनी आपल्या छोट्याशा आयुष्यात वैचारिक क्रांतिची ज्योत पेटवली. भगतसिंगांची लढाई केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरतीच मर्यादित नव्हती तर ती सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी होती. ब्रिटीशांच्या जोखडातून मातृभूमीला मुक्त करण्याबरोबरच समाजवादी रचनेवर आधारित समाज निर्माण करण्याचे भगतसिंग यांचे स्वप्न होते. सर्व माणसांच्या काही अत्यावश्यक गरजा आहेत. सर्वांना अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार या अत्यावश्यक गरजा भागविण्याची सोय होणे म्हणजे समाजवाद, अशी भगतसिंगांनी व्याख्या केली होती.’
यावेळी आदिम संस्थचे समीर गारे, राहुल कारंडे, एसएफआय चे रोहिदास फलके, डीवायएफआय चे महेश गाडेकर आदी उपस्थित होते.
हे ही वाचा :
अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !
शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….
मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर
अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !
मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ
Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान