Tuesday, March 11, 2025

Delhi Metro : अंगाला रंग लावून दोन मुल्लींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !

Delhi Metro : होळी सण साजरा करण्यासाठी उत्साहाचे वातावरण आहे. कुठे होलिका दहनची तयारी सुरू आहे तर कुठे रंग खेळण्याची. होळीच्या उत्सवादरम्यान दिल्ली मेट्रोमध्ये (Delhi Metro) असभ्य वर्तन करणाऱ्या दोन मुलींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मेट्रोमध्ये अश्लील डान्स पाहून सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. (Delhi Metro Sexy dance)

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

व्हायरल व्हिडीओ दिल्ली मेट्रोतील (Delhi Metro) आहे. व्हिडीओमध्ये दोन तरुणी दिसत आहे ज्यांनी पांढऱ्या रंगाचे पारंपारिक भारतीय पोशाख परिधान केले आहे. एकीने पांढरी साडी नेसली आहे तर दुसरीने पांढरा ड्रेस परिधान केला आहे. दोघींच्या चेहऱ्याला रंग लावलेला दिसत आहे. या तरुणी रामलीला चित्रपटातील मोहे अंग लगा दे रे…मोहे रंग लगा दे रे या गाण्यावर अश्लील डान्स करताना दिसत आहे.

दोघी एकमेकांना रंग लावत आहेत. दोघी एकमेकांच्या अंगावर जाऊन अश्लील डान्स करत आहे. पण, दोघींनाही आपण कुठे आहोत याचे अजिबात भान राहिलेले नाही असे दिसते आहे. दोघींचा अश्लील डान्स पाहून मेट्रोमधून प्रवास करणारे प्रवासी ओशाळले आहेत.

सहप्रवाशांनी पाहिलेल्या या घटनेवर ऑनलाइन वापरकर्त्यांकडून तीव्र टीका झाली आहे, ज्यांनी मुलींच्या वर्तन अयोग्य असल्याने निषेध व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त, दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने अशा वर्तनावर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले जात आहे.

एका सोशल मीडिया वापरकर्त्याने त्याच्या X खात्यावर व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले, ‘आम्हाला याविरोधात लवकरात लवकर कायदा हवा आहे.’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सार्वजनिक सभ्यतेबद्दल नेटकऱ्यांची चर्चा सुरू झाली.

whatsapp link

हे ही वाचा :

मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर

अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !

मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ

Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

मोठी बातमी : शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष प्रवेशाची तारिख ठरली

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

Related Articles

- Advertisement -

Latest Articles