Monday, March 17, 2025

Alandi : वडमुखवाडीत श्रीविठ्ठल रुख्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन दिन उत्साहात

आळंदी (अर्जुन मेदनकर) – येथील वडमुखवाडी मधील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल रुख्मिणी, श्री राम , लक्ष्मण, सीता, श्री राधाकृष्ण व श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठापना तिसरा वर्धापन दिन आणि श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन ३७५ वा बीज सोहळा, एकादशी निमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात ग्रामस्थांचे वतीने उत्साहात झाले. (Alandi)

विविध धार्मिक कार्यक्रमात पहाटे श्रीना अभिषेख पूजा, काकडा आरती झाली. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळात प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प.उमेश महाराज दशरथे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. यावेळी ते म्हणले, आपल्या संस्कृतीत श्रींचे मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना सजीव मानले जाते. तिचा उत्सव परंपरेने होणे गरजेचे आहे. आता पर्यंत ग्रामस्थांनी हि परंपरा चालवली आहे. या पुढे हि चालू राहावी अशी भावना कीर्तनकार दशरथे यांनी व्यक्त केली. वर्धापन दिना निमित्त श्रींचे मंदीरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई आणि आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होतो. भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी करीत दर्शन घेतले. (Alandi)

या प्रसंगी कीर्तनास श्री पद्मावती ट्रस्टचे अध्यक्ष पंडित महाराज तापकीर, गणेश महाराज तापकीर, भजनी मंडळ अध्यक्ष भानुदास महाराज तापकीर, थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲड विष्णू तापकीर, सचिन महाराज गिलबिले, वसंत महाराज तापकीर लोकल बोर्ड संचालक शांताराम तापकीर, चेअरमन सुरेश तापकीर आदी मान्यवर व भाविक उपस्थित होते. भाविकांना फराळ महाप्रसाद वाटप करण्यात आले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles