Junnar : वनजमिनीत अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जुन्नर (Junnar) वनविभागाने केलेल्या कारवाईत खोडद-नारायणगड येथील बेघर झालेल्या आदिवासी कुटुंबांना शिवली (ता. जुन्नर) येथील ग्रामस्थांनी मदतीचा हात दिल्याचे सरपंच मंगेश आढारी यांनी सांगितले.
नारायणगाव (खोडद) येथील नारायण गड मधील आदिवासी भिल्ल समाज यांच्यावर वनविभागाने कारवाई करून त्यांची घरे, जमिनी, पिण्याच्या पाण्याची विहीर इत्यादी नष्ट केले आहे. या विरोधात मंचर प्रांत कार्यालयासमोर लहान मुले व माणसे आंदोलनासाठी बसले आहेत.
वनविभागाच्या कारवाईत घरे, जमिनी, पाण्याची विहीर आदी नष्ट केल्याने येथील कुटुंबे बेघर झाली आहेत. त्यांना गावामधून आर्थिक खर्चासाठी लोकवर्गणीतून पाच हजार रुपये व उदरनिर्वाहासाठी ११० किलो तांदूळ दिला.
यावेळी पोलिस पाटील नंदकुमार कोथेरे, माजी सरपंच मगन कोथेरे, संजय आढारी, अजय आढारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आदिवासी गावांनीही त्यांना मदत करावी, असे आवाहन यावेळी केले.
हे ही वाचा :
अंगाला रंग लावून दोन मुलींचे अश्लिल चाळे, मेट्रोतील व्हिडिओ व्हायरल !
शिवसेना राज ठाकरेंकडे जाणार ?, फडणवीस म्हणाले हे खरं आहे….
मोठी बातमी : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी जाहीर
अभिनेत्री स्वरा भास्कर लढणार लोकसभा निडणूक, ‘हा’ पक्ष देऊ शकतो तिकीट !
मोठी बातमी : प्रकाश आंबेडकर यांनी घेतला मोठा निर्णय, महाविकास आघाडीत खळबळ
Bhutan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान