जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर तालुका बार असोसिएशनच्या प्रतिवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. शिवदास तांबे विजय झाले. (Junnar)
अँड.शिवदास तांबे यांना १२२ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी ॲड.केतन पडवळ यांना ७६ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या तिरंगी लढतीत, ॲड. महावीर चोरडिया यांनी १५० मते आणि अजिज खान यांनी १३१ मते मिळवत विजयी झाले. तर ॲड. निलिमा शेरकर यांना १०७ मते मिळाली. एकूण २१८ मतदारांपैकी १९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सचिव पदासाठी ॲड.आशिष वानखेडे यांची यावर्षी बिनविरोध निवड झाली. (Junnar)
मागील वर्षी त्यांनी १२२ मते मिळवत विजयी मिळवला होता.त्यांना दुसऱ्यांदा सचिव पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. ग्रंथपालपदासाठी झालेल्या लढतीत ॲड.गणेश आल्हाट १६० मते मिळवत विजयी झाले. सहसचिव महिला राखीव पदावर ॲड.स्वाती दुराफे, खजिनदारपदी ॲड.सुदर्शन पारखे, लेखापरीक्षकपदी ॲड.संजय उकिरडे तसेच कार्यकारणी सदस्यपदी ॲड.भुषण शेटे,ॲड.नूतन शेगर, ॲड.शिवम नायकोडी यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड.शरद गुरव, ॲड. कृष्णकांत ढमढेरे ॲड.कुसुम उतळे, तसेच मदतनीस म्हणून ॲड. गौरव रोकडे, रेवणनाथ कांडेकर यांनी काम पाहिले.
हे ही वाचा :
सर्वात मोठी भरती : भारतीय स्टेट बँक अंतर्गत तब्बल 13,735 जागांसाठी मेगा भरती
जुन्नर बस स्थानकात पिकअप वाहनाचे धोकादायक स्टंट करणारा पोलिसांच्या ताब्यात
मोठी बातमी : प्रख्यात तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन
मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप
परभणीतील हिंसाचारानंतर आंबेडकरवादी उच्च शिक्षित तरूणाचा पोलिस कोठडीत मृत्यू, सर्वत्र खळबळ
ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी