Home ताज्या बातम्या मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी

मोठी बातमी : 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी

39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी 39 ministers took oath of office, read the list Maharashtra Cabinet List

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानंतर, राज्याच्या नव्या सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर पूर्ण झाला आहे. आज नागपूर येथील राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात एकूण 39 मंत्र्यांनी आपल्या पदांची शपथ घेतली. (Maharashtra Cabinet List)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या मंत्रिमंडळात भाजपाचे 19, शिवसेना शिंदे गटाचे 11, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या जोडीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये मंत्रीपदे आहे. परंतु १६ जिल्ह्यांमधी मंत्री म्हणून कोणालाच संधी नाही. पुणे, जळगाव-नाशिकमधून तीन-तीन मंत्री झाले आहेत. तसेच साताऱ्यास सर्वाधिक चार मंत्रीपदे दिली.

Maharashtra Cabinet List

मंत्रिपदाची शपथ :
1) चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा
2) राधाकृष्ण विखे पाटील, भाजपा
3) हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस
4) चंद्रकांत पाटील, भाजपा
5) गिरीश महाजन, भाजपा
6) गुलाबराव पाटील, शिवसेना
7) गणेश नाईक, भाजपा
8) दादा भुसे, शिवसेना
9) संजय राठोड, शिवसेना
10) धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
11) मंगलप्रभात लोढा, भाजपा
12) उदय सामंत, शिवसेना
13) जयकुमार रावल, भाजपा
14) पंकजा मुंडे, भाजपा
15) अतुल सावे, भाजपा
16) अशोक उईके, भाजपा
17) शंभूराज देसाई, शिवसेना
18) आशिष शेलार, भाजपा
19) दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस
20) आदिती तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस
21) शिवेंद्रराजे भोसले, भाजपा
22) माणिकराव कोकाटे, भाजपा
23) जयकुमार गोरे, भाजपा
24) नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेस
25) संजय सावकारे, भाजपा,
26) संजय शिरसाट – शिवसेना
27) प्रताप सरनाईक, शिवसेना
28) भरत गोगावले, शिवसेना
29) मकरंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
30) नितेश राणे, भाजपा
31) आकाश फुंडकर, भाजपा

राज्यमंत्री पदाची शपथ :
32) बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
33) प्रकाश आबिटकर, शिवसेना
34) माधुरी मिसाळ, भाजपा (राज्यमंत्री)
35) आशिष जैस्वाल, शिवसेना (राज्यमंत्री)
36) पंकज भोयर, भाजपा (राज्यमंत्री)
37) मेघना बोर्डीकर, भाजपा (राज्यमंत्री)
38) इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (राज्यमंत्री)
39) योगेश कदम, शिवसेना (राज्यमंत्री)

हे ही वाचा :

मोठी बातमी : आज महायुती सरकारच्या नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी

धक्कादायक : शस्त्रक्रियेनंतर 43 महिलांना झोपवले जमिनीवर, नागरिकांचा संताप

ब्रेकिंग : जळगाव येथे बस-ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एक ठार, २१ जखमी

ब्रेकिंग : …म्हणून अल्लू अर्जुनला जेलमध्ये काढावी लागली रात्र

खुशखबर : लाडकी बहीण योजनेचा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, महत्वाची माहिती समोर

लोकसभेत प्रियांका गांधी यांची मोदी सरकार जोरदार टीका, राजा वेश बदलतो…

काश्मीर मध्ये मायनस तापमान, उत्तर भारतासह महाराष्ट्रात थंडीची लाट कायम

मोठी बातमी : साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक, वाचा काय आहे प्रकरण !

मोठी बातमी : सर्वात कमी वयात डी. गुकेश ने वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप जिंकत रचला इतिहास

Exit mobile version