पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर – शिवतेजनगर, चिंचवड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दि. १४ डिसेंबर रोजी दत्तजयंती महोत्सव अतिशय मंगलमय आणि विधिवत पद्धतीने पार पडला. दत्तजयंतीच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. (PCMC)
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी सांगितले की, दि.६ डिसेंबर पासून गुरु चरित्र पारायण आयोजित केले होते, यामध्ये २४० भाविकांनी ग्रंथ वाचन केले. श्रीचा अभिषेक, स्वामी समर्थ महिला भजनी मंडळ, शिवतेज नगर महिला भजनी मंडळ, नारायणी महिला भजनी मंडळ, ज्ञानाई महिला भजनी मंडळ सह हभप रामदास महाराज तांबे(वरुडे) आळंदी यांचे कीर्तन आयोजित केले होते.
तसेच स्वर-सागरचा भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. गेली १२ वर्षे आम्ही दत्तजयंती महोत्सवाद्वारे परिसरातील हजारो नागरिकांना धार्मिक, संस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद मिळवून देत आहोत, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांनी सांगितले.
गुरुचरित्र पारायण सोहळा सुमारे २४० सेवेकरयांनी भाग घेत पार पडला. दर्शनासाठी भविकांनी प्रचंड गर्दी करत सुमारे पंधरा हजारच्या वर नोंद करण्यात आली. अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी नगरसेवक श्री नारायण बहिरवाडे यांनी दिली. (PCMC)
सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तर एवढा मोठा समुदायअतिशय शिस्तबद्ध आणि नियोजित ठेवण्यासाठी श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघ, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ आणि श्री स्वामी समर्थ युवा मंच च्या सर्व सेवेकर्यांनी योगदान दिले. प्रतिष्ठानच्या वतीने श्रीं चा अभिषेक,आरती, होम हवन, भजन, प्रवचन, सुगम संगीत आणि महाप्रसाद अशा क्रमाने दत्त जन्म उत्साहात साजरा करण्यात आला. परिसरातील सर्वात मोठी भाविकांची नोंद झाल्याने सर्व स्तरातून चर्चा होत आहे. (PCMC)
![](https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2024/12/1000310838-1024x460.jpg)
कार्यक्रमाचे सर्व नियोजन श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री नारायण बहिरवाडे, कार्याध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष राजू गुणवंत, श्री स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष हरिनारायन शेळके, श्री स्वामी समर्थ महिला मंडळ अध्यक्षा सारिका रिकामे, मुख्य सेवेकरी क्षमा काळे, श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ अध्यक्षा देव काकू, आणि श्री स्वामी समर्थ युवा मंच अध्यक्ष चैतन्य बनकर यांनी केले.
श्री दत्तजयंती उत्सवानिमित्ताने भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे व पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आण्णा बनसोडे यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. या प्रसंगी जेष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे यांनी सूत्र संचालन केले.
अशाच प्रकारे पुढील उत्सवही प्रतिष्ठान कडून भाविकांसाठी आजोजित करण्यात येतील असे आवाहन श्री नारायण बहिरवाडे यांनी केले.
नारायण बहिरवाडे यांच्याकडून प्रतिष्ठानच्या सर्व सेवेकाऱ्यांचे अतिशय शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल कौतुक करण्यात आले आणि हा एक पिंपरी चिंचवड नगरी साठी आदर्श ठरेल असेही ते म्हणाले.