जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) जुन्नर तालुका समितीच्या वतीने आज जुन्नर बस स्थानक समोर निदर्शने करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून परिवहन महामंडळ नारायणगाव आगरचे व्यवस्थापक विटे साहेब व संघटनेच्या शिष्टमंडळा सोबत २ तास चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय झाल्याची माहिती एसएफआय चे जिल्हा समिती सदस्य राजू शेळके व तालुका सचिव अक्षय घोडे यांनी दिली. Major Decision on ST Bus Tours; Success of SFI’s agitation
बैठकीतील निर्णय पुढीलप्रमाणे :
1. जुन्नर ते भिवाडे मुकामी बस २० सप्टेंबर २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे.
2. जुन्नर ते पारगाव ४:०० वाजताची नवीन बस २० सप्टेंबर २०२३ रोजी चालू करण्यात येणार आहे.
3. जुन्नर ते अंजनावळे २:०० वाजताची बस २० सप्टेंबर २०२३ पासून नियमित चालू करण्यात येणार आहे.
4. जुन्नर ते माणिकडोह आय. टी. आय ४: ३० वाजता बस चालू करण्यात आली आहे.
यावेळी एसएफआय चे तालुका सचिव अक्षय घोडे, सदस्य सूरज बांबळे, राजू शेळके, किरण दाते, साहिल जोशी, नवनाथ सुरकुले, रवी बुफे, किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ताालुका सचिव गणपत घोडे, संजय साबळे, ज्ञानेश्वर शेळके उपस्थित होते.