Thursday, November 7, 2024
Homeराजकारणमहाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर

महाविकास आघाडीने जनतेला दिली पाच मोठी आश्वासने; जाणून घ्या सविस्तर

Mahavikas Aaghadi : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मुंबईतील बीकेसी मैदानात एक भव्य सभा घेतली. या सभेत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला पाच महत्त्वाच्या आश्वासनांची ग्वाही दिली आहे. या सभेत काँग्रेस खासदार राहुल गांधी, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित राहून नागरिकांना आवाहन केले.

महाविकास आघाडीने दिलेली पाच प्रमुख आश्वासने अशी आहेत :

1.महिला सक्षमीकरणासाठी आर्थिक मदत आणि मोफत बस प्रवास : महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत राज्यातील महिलांना दर महिन्याला 3,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले आहे. यासोबतच महिलांसाठी आणि मुलींसाठी मोफत एसटी बस प्रवासाची सुविधा देण्याचा वादा करण्यात आला आहे.

2.शेतकऱ्यांना कर्जमाफी : राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असून नियमित कर्जफेडीसाठी शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन दिले जाणार आहे.

3.जातनिहाय जनगणना आणि आरक्षण : महाविकास आघाडीने जातनिहाय जनगणना करण्याचे तसेच 50% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे, जेणेकरून सामाजिक न्यायाला अधिक चालना मिळेल.

4.विनामूल्य आरोग्य सेवा : राज्यातील नागरिकांसाठी 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा आणि मोफत औषधे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

  1. बेरोजगार तरुणांसाठी मदत : राज्यातील बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4,000 रुपयांपर्यंत आर्थिक मदत देणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीने दिले आहे.

या घोषणा महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारामध्ये महाविकास आघाडीच्या महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Mahavikas Aaghadi

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय