Friday, November 22, 2024
Homeआरोग्यकोरोनाकोरोना अपडेट : राज्यात ९ लाख ४० हजार लोक होम क्वारंटाईन

कोरोना अपडेट : राज्यात ९ लाख ४० हजार लोक होम क्वारंटाईन

मुंबई  : राज्यात आज दिवसभरात १० हजार २२१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८ हजार ९६८ नवीन रुग्णांची नोंद झाली. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत असल्याने राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची (उपचार सुरू असलेले) संख्याही कमी होत आहे. आतापर्यंत राज्यभरात २ लाख ८७ हजार ०३० रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६३.७६ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४७ हजार १७ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २२ लाख ९८ हजार ७२३ नमुन्यांपैकी ४ लाख ५० हजार १९६ नमुने पॉझिटिव्ह (१९.५८ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४० हजार ४८६ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ००९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय