Saturday, May 18, 2024
HomeNewsकोरोनावरील लसीचे २०२१ पर्यंत मोठ्याप्रमाणात उत्पादन होऊ शकते यासह देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या...

कोरोनावरील लसीचे २०२१ पर्यंत मोठ्याप्रमाणात उत्पादन होऊ शकते यासह देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी

देश विदेश

१) बटालियन प्रमुखांची चीन बरोबर झालेल्या चर्चेची भारत सरकार समिक्षा करणार


नवी दिल्ली, भारत: चीनबरोबर होत असलेली बटालियन प्रमुखांची चर्चा कशाप्रकारे होत आहे याची सरकार समिक्षा करणार आहे. चीनचे एप्रिल मे पासून सैन्य भारताच्या सीमेत घुसले असताना त्यावर कशाप्रकारे मार्ग काढत आहे याची ही समिक्षा सरकार करणार आहे.

२) अफगाणिस्तान मध्ये मोठ्याप्रमाणात तुरूंग तोडण्याचा प्रयत्न, २९ लोक मृत्यूमुखी


जलालाबाद, अफगाणिस्तान: इस्लामिक स्टेट्स या दहशतवादी संघटनेने जलालाबाद जवळील तुरूंग तोडण्यासाठी स्फोट करून मोठ्याप्रमाणात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याच तुरूंगाचा त्यांच्या दहशतवादी संघटनेने संलग्न लोक मोठ्यासंख्येने अटकेत आहेत.

३) ब्रिटन महात्मा गांधींचे छायाचित्र असलेली नाणी छापण्याच्या विचारात


लंडन, ब्रिटन: अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्यांची नाणी चलनात आणण्याचा विचार ब्रिटनच्या अर्थमंत्रालयाने घोषित केल्यावर महात्मा गांधींचे नाव पुढे आलेले असून त्यावर संसद विचार करणार आहे.

४) बोको हराम या दहशतवादी संघटनेने कामेरून जवळ केलेल्या हल्ल्यात १५ लोक मरण पावले


दौला, नायजेरिया: बोको हराम या दहशतवादी संघटनेने नायजेरियाच्या सिमेलगत असलेल्या कॅम्पजवळ हल्ला केला त्यात १५ लोक मृत्यूमुखी पडले आहेत. त्यात असणाऱ्या दहशतवाद्याने ग्रेनाईटच फेकले.

५) ३०० तालिबानचे कैद्यांची गोळीबंदी काळात सुटका अफगाणिस्ताने केली


काबूल, अफगाणिस्तान: गोळीबार बंदीच्या अफगाणिस्तानने सुचना दिल्यानंतर प्रथमच ३०० कैद्यांची त्याअंतर्गत सुटका अफगाणिस्तान सरकारने केली. शांतता चर्चा चालु ठेवण्यासाठी असे केल्याचे समोर येत आहे.

६) चीनने अमेरिका चीनी विद्यार्थी, संशोधकांना त्रास देत असल्याचा आरोप केला


बीजिंग, चीन: चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिका विद्यार्थी आणि संशोधकांना त्रास देत असल्याचा आरोप केला. सदर वक्तव्य कॅलिफोर्नियातील चीनी विद्यार्थ्यांना जामिन न मिळाल्यानंतर केले.

७) चीनने न्युझीलंड बरोबर असलेल्या द्विपक्षिय नागरिक हस्तांतरण करार रद्द केला


हॉगकॉग, चीन: चीनने न्युझीलंड बरोबर असलेल्या नागरिक हस्तांतरण करार रद्द केला. न्युझीलंड चीनच्या अंतर्गत बाबतीत दखल देत असल्याचा चीनने आरोप केला.

८) कोरोनावरील लसीचे मोठ्याप्रमाणात उत्पादन २०२१ होऊ शकते: रशिया


मॉस्को, रशिया: रशिया कोरोनालसीचे प्रोटोटाईपची चाचणी गमालेया इन्सिस्टीटुट ऑफ टेक्नॉलॉजी मॉस्को येथे मोठ्याप्रमाणात चालु आहे. त्यानंतर देशांतर्गत त्याची नोंदणी होणार असून त्यानंतर त्याचे उत्पादन केले जाणार आहे.

९) रॉम्सवेअरची भीती अमेरिकेच्या निवडणूकीवरती आलेली आहे


वॉशिग्टन, अमेरिका: मतदान यंत्रणेवरती रॉम्सवेअर प्रभाव पडू शकतो. तसेच निवडणूकची माहिती चोरी होण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. सरकारी यंत्रणा त्यासाठी मोठ्याप्रमाणात तयारीला लागली आहे.

१०) नासाचे वैज्ञानिक समुद्रात अवकाशयानातून उतरले


न्युयॉर्क, अमेरिका: स्पेस एक्सच्या अवकाशयानातून वैज्ञानिक समुद्रात उतरली. जागतिक अवकाश संशोधन संस्थेवर ते मुक्कामी होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय