Friday, July 5, 2024
Homeताज्या बातम्यामोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलल्या

मोठी बातमी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलल्या

मुंबई, दि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा- २०२३ लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता १ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आली होती. टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (MPSC)

१ जुलै २०२४ ते ३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी नियोजित असलेल्या सर्व उमेदवारांची टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्याची सुधारित तारीख स्वतंत्रपणे घोषित करण्यात येईल, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आयोगाने कळविले आहे.

या परीक्षेमधील लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरिता टीसीएस या सेवा पुरवठादार संस्थेमार्फत दिनांक ०१ जुलै, २०२४ ते १३ जुलै, २०२४ रोजी टंकलेखन कौशल्य चाचणी आयोजित करण्यात आली आहे. तथापि दिनांक ०१ जुलै, २०२४ रोजी प्रथम सत्राकरिता उपस्थित उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही.

यामध्ये उद्भवलेल्या तांत्रिक अडचणीचे निराकरण करण्यासाठी लागू शकणारा वेळ विचारात घेऊन दिनांक ०१ जुलै, २०२४ ते ०३ जुलै, २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेली टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.

google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

प्रादेशिक गहू गंज संशोधन केंद्र, महाबळेश्वर अंतर्गत भरती

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती

Cotcrop : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती

DDPDOO : पुणे येथे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 पदांची भरती

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय