Saturday, April 27, 2024
Homeनोकरीपोलिस भरती : १८ हजारांची भरती प्रक्रिया ८ दिवसांत..!

पोलिस भरती : १८ हजारांची भरती प्रक्रिया ८ दिवसांत..!

नागपूर : केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेप्रमाणेच येत्या वर्षभरात महाराष्ट्रात सुद्धा ७५ हजार तरुणांना रोजगार (Nokari) देण्याची योजना राबवणार असून येत्या वर्षभरात महाराष्ट्रात ७५ हजार तरुणांना नोकऱ्या द्यायच्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही १८ हजार पोलिसांच्या भरतीची जाहिरातही (Police Bharti 2022) येत्या आठवड्याभरात काढत आहोत. मुख्यमंत्र्यांनी इतरही विभागांनाही अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. सगळ्या विभागांच्या जाहिराती ( Maharashtra Government Job) काढून मोठ्या प्रमाणावर तरुणाईला नोकरभरतीत प्राधान्य देण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातही केला जाणार असून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधीही आम्ही बेरोजगारांना उपलब्ध करून देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री/ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील रोजगार मेळाव्यात बोलताना दिली आहे.

राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई (Police constable) संवर्गातील सन- २०२१ मध्ये रिक्त असलेली पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील एकूण ११४४३ एवढी पदे भरतीसाठी उपलब्ध असून त्यासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबविण्याला यापूर्वीच मंजुरी देण्यात आलेली असून सद्यस्स्थतीत कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्ट्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदरील संवर्गातील १०० % रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक असल्याने पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय